घरदेश-विदेशनियमांचे पालन न केल्याबद्दल एअर एशियाला 20 लाखांचा दंड, डीजीसीएची कारवाई

नियमांचे पालन न केल्याबद्दल एअर एशियाला 20 लाखांचा दंड, डीजीसीएची कारवाई

Subscribe

नवी दिल्ली : हवाई वाहतुकीसंबंधीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअर एशियावर दंडात्मक कारवाई केली आहे. एअर एशियाने वैमानिकांच्या प्रावीण्य तपासणी तसेच इंस्ट्रूमेंट रेटिंग चेक (जी आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संस्थेची आवश्यकता आहे) यादरम्यान वैमानिकांच्या दृष्टीने अनिवार्य सराव कार्यक्रम आयोजित न केल्याबद्दल डीजीसीएने 20 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

- Advertisement -

एअर एशिया (इंडिया) लिमिटेडला वीस लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच, डीजीसीएच्या नियमांनुसार ड्युटी योग्यरीत्या न पार पडल्याबद्दल एअर एशिया (इंडिया) लिमिटेडच्या 8 नियुक्त परीक्षकांना प्रत्येकी 3 लाख रुयपांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय, कर्तव्य बजावण्यात अयशस्वी ठरल्याबद्दल प्रशिक्षण प्रमुखांना 3 महिन्यांच्या कालावधीसाठी पदावरून हटविण्याचे आदेशही डीजीसीएने दिले आहेत.

याआधीही विमान कंपन्यांवर दंडात्मक कारवाई
गेल्या वर्षी डिसेंबर पॅरिस येथून दिल्ली येथे येणाऱ्या विमान प्रवासात दोन प्रवाशांनी गैरवर्तन केले होते. एआय-142 (Paris – New Delhi) या विमानात एक प्रवासी शौचालयात धुम्रपान करत होता. तो प्रवासी दारूही प्यायला होता. विमान कर्मचाऱ्यांचे तो काहीच ऐकत नव्हता. तर दुसरा एक प्रवासी महिलेच्या आसनावर बसला होता. या दोन्ही घटनांची माहिती एअर इंडियाने विमान प्राधिकरणाला दिली नाही, असा ठपका ठेवत विमान प्राधिकरणाने एअर इंडियाला दहा लाखांचा दंड ठोठावला होता.

- Advertisement -

तर, शंकर मिश्रा याने वृद्ध महिलेवर लघुशंका केल्याच्या प्रकरणात विमान प्राधिकरणाने (डीजीसीए) एअर इंडियाला 30 लाखांचा दंड ठोठावला. तसेच, त्या विमानाच्या पायलटचा परवाना रद्द करण्यात आला आहे. विमानात सेवा पुरवणाऱ्या कंपनीलाही तीन लाखांचा दंड प्राधिकरणाने सुनावला होता.

हेही वाचा – ‘जिहादी वधू’वरील माहितीपटावरून बीबीसी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, ब्रिटनमध्ये कडाडून विरोध

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -