घरताज्या घडामोडी'ते' म्हणजे सिंधुदुर्गाला लागलेली कीड; नारायण राणेंचा विनायक राऊतांवर पलटवार

‘ते’ म्हणजे सिंधुदुर्गाला लागलेली कीड; नारायण राणेंचा विनायक राऊतांवर पलटवार

Subscribe

मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर येथे रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारीसे यांचा ६ फेब्रुवारीला अपघात झाला होता. शशिकांत वारीसे यांच्या अपघातानंतर हत्येप्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याप्रकरणी विरोधकांनी सत्ताधारी शिंदे – फडणवीस सरकारला धारेवर धरले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर येथे रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारीसे यांचा ६ फेब्रुवारीला अपघात झाला होता. शशिकांत वारीसे यांच्या अपघातानंतर हत्येप्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याप्रकरणी विरोधकांनी सत्ताधारी शिंदे – फडणवीस सरकारला धारेवर धरले आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी या अपघाताप्रकरणी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यावर आरोप केले आहेत. याच पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनीही विनायक राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. ‘विनायक राऊत म्हणजे आमच्या सिंधुदुर्गाला लागलेली कीड आहे’, अशा शब्दांत नारायण राणे यांनी विनायक राऊत यांना प्रत्युत्तर दिले. (Union Minister Narayan Rane Slams Vinayak Raut On ratnagiri journalist shashikant warise)

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आज पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. “विनायक राऊत म्हणजे आमच्या सिंधुदुर्गाला लागलेली कीड आहे. विकास कामाला व्यत्यय आणणे, आंदोलन करणे, अडथळे निर्माण करणे. मी विनायक राऊत यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला आलेलो नाही. माझा वेळ पुण्याच्या लोकांना सत्कारणी लागावा, यासाठी मी इथे आलेलो आहे”, असे नारायण राणे यांनी म्हटले.

- Advertisement -

“कुठलीही हत्या झाली, अपघात झाला तर तेवढेच प्रश्न विचारायचे का. पुण्यात विकासाचे, सामाजिक कोणतेच विषय नाही आहेत का?. पत्रकारांनी कुठलाही विषय आला तर तोच लाऊन धरायचा का? स्थानिक प्रश्न प्राधान्यांने विचारले पाहीजे. जिकडे जावे तिकडे तोच विषय आहे, काय लावलं हे. चौकशी होत आहे, या प्रकरणात कुणाचे नाव असेल तर तो पाहून घेईल”, असेही नारायण राणे म्हणाले.

यावेळी नारायण राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. “संजय राऊत यांची मी दखल घेत नाही. संजय राऊत महाराष्ट्राचे कोणी मोठे नेते नाही आहेत. बदनाम व्यक्ती आहेत. सध्या सामना चालत नाहीत म्हणून ब्रेकींग न्यूज टाकण्यासाठी ते असे प्रयत्न करत आहेत”, असे नारायण राणे यांनी म्हटले.

- Advertisement -

नेमके काय म्हणाले विनायक राऊत?

रिफायनरी आणि जमीन दलालांच्या विरोधात मागच्या अनेक वर्षापासून आवाज उठवणारे शशिकांत वारीसे यांचा घातपात झाला आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता, न्यायासाठी लढणारे म्हणून वारिसेंचा उल्लेख होता. वारिसेंच्या हत्येचा पोलिसांनी योग्य तो तपास करावा. सिंधुदुर्गमध्ये जिल्हा नियोजनची बैठक झाली होती. भाजपाचे जबाबदार केंद्रीय नेते यांनी जिल्हा नियोजनच्या बैठकीत मालवचं सी-वर्ल्ड आणि रिफायनरी याच्याविरोधात येणाऱ्यांची गय करू नका; प्रसंगी पोलिसांचा वापर करून प्रकल्प राबवा, असं वक्तव्य केलं होतं. तसेच, हा गुंडगिरी करणारा आंबेरकर नारायण राणे किंवा निलेश राणेंबरोबर असतो. त्यांच्या चिथावणीमुळे वारीसेसारख्या पत्रकाराची हत्या करण्याचं षडयंत्र आंबेकरने आखलं”, असा गंभीर आरोप विनायक राऊतांनी केला.


हेही वाचा – वारीशे हत्या प्रकरण : राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोचा उदय सामंतांकडून खुलासा, म्हणाले – ‘खाणेरडं राजकारण’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -