घरअर्थजगतSBI च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी; बँकेकडून कर्जावरील व्याजात वाढ, आजपासून नवे...

SBI च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी; बँकेकडून कर्जावरील व्याजात वाढ, आजपासून नवे दर लागू

Subscribe

बहुतेक ग्राहक कर्जे एका वर्षाच्या किरकोळ खर्चावरील आधारित कर्जदरावर घेतात. अशा परिस्थितीत MCLR वाढल्यामुळे वैयक्तिक कर्ज, वाहन आणि गृह कर्ज महाग होऊ शकते

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. SBIने किरकोळ खर्च आधारित कर्जदर म्हणजेच MCLR 10 अंकांनी वाढवला आहे. त्यामुळे आता बँकेकडून कर्ज घेणे महाग होणार आहे. बँकेचे नवीन दर 15 फेब्रुवारी 2023 पासून लागू झालेत. रेपो रेट वाढवल्यानंतर अनेक बँकांनी MCLR वाढवला आहे.

बहुतेक ग्राहक कर्जे एका वर्षाच्या किरकोळ खर्चावरील आधारित कर्जदरावर घेतात. अशा परिस्थितीत MCLR वाढल्यामुळे वैयक्तिक कर्ज, वाहन आणि गृह कर्ज महाग होऊ शकते. आता तुम्हाला कर्ज घेताना पूर्वीपेक्षा जास्त EMI भरावा लागणार आहे. याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे.

- Advertisement -

नवीन MCLR दर काय?
SBI ने ओव्हरनाइट MCLRच्या दरात 7.95%, 1 महिन्यासाठी MCLR दर 8.10% आणि 3 महिन्यांसाठी MCLR दर 8.10% केला आहे. तसेच बँकेचा MCLR दर 6 महिन्यांसाठी 10 बेसिस पॉइंटने वाढवून 8.40 टक्के, MCLR 1 वर्षासाठी 8.40 टक्क्यांवरून 8.50 टक्के, 2 वर्षांसाठी MCLR 8.50 टक्क्यांवरून 8.60 टक्के आणि 3 वर्षांसाठी MCLR दर 8.60 टक्क्यांवरून 8.70 टक्के झाला आहे.

MCLR म्हणजे काय?
विशेष म्हणजे MCLR ही भारतीय रिझर्व्ह बँकेने विकसित केलेली एक पद्धत आहे, ज्याच्या आधारे बँका कर्जासाठी व्याजदर ठरवतात. त्याआधी सर्व बँका बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठी व्याजदर निश्चित करत होत्या.

- Advertisement -

रेपो दरात सलग सहाव्यांदा वाढ
8 फेब्रुवारी रोजी आरबीआयने पुन्हा एकदा रेपो दरात 25 बेसिस पॉइंटची म्हणजेच 0.25 टक्क्यांची वाढ केली आहे. रेपो दरात सलग सहाव्यांदा ही वाढ झाली आहे. पतधोरण बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. जगातील वाढत्या महागाईचा दबाव भारतावरही आहे आणि त्यावर पूर्णपणे मात करण्यासाठी कर्जाच्या व्याजदरात पुन्हा एकदा वाढ करणे आवश्यक आहे. मात्र, यावेळी रेपो दरात केवळ 0.25 टक्के वाढ करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली होती.


हेही वाचाः मंत्रालयात बोगस नोकऱ्यांचा सुळसुळाट, धनंजय मुंडेंच्या नावाखाली तरुणाची सात लाखांची फसवणूक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -