घरमहाराष्ट्रमुंबईच्या रस्त्यांवर मंगळवारपासून धावणार एसी डबलडेकर बस

मुंबईच्या रस्त्यांवर मंगळवारपासून धावणार एसी डबलडेकर बस

Subscribe

बेस्टच्या ताफ्यात बेस्ट उपक्रमाने भाडेतत्त्वावरील एसी इलेक्ट्रीक ९०० डबलडेकर बसेस घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या बेस्टच्या ताफ्यात जुन्या ४५ डबलडेकर बसगाड्या असून त्या हळूहळू भंगारात काढण्यात येणार आहेत. तसेच, या महिन्याअखेरपर्यंत बेस्टच्या ताफ्यात आणखीन ५ एसी डबलडेकर बसगाड्या दाखल होणार आहेत.

मुंबई : इंग्लडच्या धर्तीवर आता मुंबईतील रस्त्यांवरही येत्या मंगळवारपासून एसी इलेक्ट्रिक डबलडेकर बस धावायला लागणार आहे. मुंबईकरांना या एसी बसमधून अवघ्या सहा रुपयांत पाच किलोमीटरचा सुखकर, पर्यावरणपूरक व गारेगार प्रवास घडणार आहे. (AC double decker buses will run on the roads of Mumbai from Tuesday)

बेस्टच्या ताफ्यात बेस्ट उपक्रमाने भाडेतत्त्वावरील एसी इलेक्ट्रीक ९०० डबलडेकर बसेस घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या बेस्टच्या ताफ्यात जुन्या ४५ डबलडेकर बसगाड्या असून त्या हळूहळू भंगारात काढण्यात येणार आहेत. तसेच, या महिन्याअखेरपर्यंत बेस्टच्या ताफ्यात आणखीन ५ एसी डबलडेकर बसगाड्या दाखल होणार आहेत. यासंदर्भातील माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली.

- Advertisement -

बेस्टच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या एसी डबलडेकर पर्यावरणपूरक गारेगार बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सीएसएमटी ते एनसीपीए असा प्रवास करताना सुरुवातीच्या पाच किलोमीटरसाठी फक्त सहा रुपये तिकीट दर आकारण्यात येणार आहे.

शनिवार ११ फेब्रुवारी रोजी पहिली एसी इलेक्ट्रीक डबलडेकर बस बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात दाखल झाली. आता आरटीओ विभागाचे क्लिअरन्स मिळाले आहे. त्यामुळे मंगळवारपासून ही डबलडेकर बसगडी मुंबईतील रस्त्यांवर धावणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – गड-किल्ल्यांचा इतिहास जपण्याचे काम शासन करणार, मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -