घरदेश-विदेशभारत-पाकिस्तान फाळणी झाली नसती तर..., व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही लोटपोट व्हाल

भारत-पाकिस्तान फाळणी झाली नसती तर…, व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही लोटपोट व्हाल

Subscribe

Pakistan Viral Video | एक पाकिस्तानी तरुण भारत-पाकिस्तान एक होऊन मोदींचं राज्य यावं अशी मागणी करताना दिसतोय. तसंच, भारत पाकिस्तान फाळणी झाली नसती तर काय झालं असतं याबाबत माहिती देताना दिसतोय.

Pakistan Viral Video | पाकिस्तानची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. महागाईने उच्चांक गाठला आहे. जनसामान्यांचं जीवन विस्कळीत झालं आहे. इंधन खर्च वाढल्याने मुलभूत गरजांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. एकंदरित पाकिस्तानात आर्थिक अराजकता माजली आहे. त्यामुळे अनेकजण पाकिस्तान सोडून इतर देशात स्थायिक होत आहेत. पाकिस्तानातील श्रीमंत लोकांनी देशाला रामराम ठोकला असून आता सामान्य जनताही देश सोडण्याच्या मार्गावर आहे. त्यातच, सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक पाकिस्तानी तरुण भारत-पाकिस्तान एक होऊन मोदींचं राज्य यावं अशी मागणी करताना दिसतोय. तसंच, भारत पाकिस्तान फाळणी (India Pakistan Partition) झाली नसती तर काय झालं असतं याबाबत माहिती देताना दिसतोय.

१९४७ मध्ये पाकिस्तानी जिंदाबादच्या घोषणा होत होत्या. पण आता पाकिस्तानातून जिवंत बाहेर पडा, पाहिजे तर भारतात जा, अशी परिस्थिती का निर्माण झाली आहे, असा प्रश्न एका पत्रकाराने एका सामान्य नागरिकाला विचारला. त्यावेळी तो म्हणाला की, भारत-पाक फाळणी झाली नसती तर ही परिस्थितीच निर्माण झाली नसती. सर्वजण एक राहिले असते. टोमॅटो २० रुपये किलो, चिकन १५० रुपये किलो, पेट्रोल १५० रुपये किलो मिळाले असते. या परिस्थितीपेक्षा मोदी भारी आहेत. त्यांना तिथे किती मानतात. आपल्या लोकांशी ते कसे राहतात. आम्हाला मोदी मिळाले पाहिजे. आम्हाला इम्रान नको, नाही बेन्जीर पाहिजेत आणि नाही मुशर्रफ पाहिजेत. आम्हाला मोदीच पाहिजेत. या देशातील लोकांना सरळ करण्यासाठी मोदींचीच गरज आहे. भारत आज जगातील पाचव्या स्थानी आहे, असं तो माणूस म्हणाला.

- Advertisement -

भारतातील मुसलमान १५० रुपये पेट्रोल घेत आहेत, १५० रुपये चिकन घेत आहेत. मग आपणही घेतलं असतं, असंही तो माणूस पुढे म्हणाला. पूर्वी आपण भारतासोबत आपली तुलना करायचो. आता तुलना करूच शकत नाही एवढ्या उंचीवर भारत पोहोचला आहे, असंही कौतुकद्गार त्याने केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -