घरनवी मुंबईनैनाच्या २३ गावांमध्ये युडीसीपीआर लागू करा; स्थानिक शेतकर्‍यांची मागणी

नैनाच्या २३ गावांमध्ये युडीसीपीआर लागू करा; स्थानिक शेतकर्‍यांची मागणी

Subscribe

नैना विरोधात ‘गाव बंद’ आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळत असून नैना नकोच, अशी भूमिका शेतकर्‍यांनी घेतलेली आहे. नैना क्षेत्रातील गावामध्ये युडीसीपीआर लागू करावा, अशी मागणी राजेश केणी आणि शेतकर्‍यांनी केली आहे. तसेच ६० टक्के जागा नैनाला देणार नसल्याची भूमिका घेण्यात आली आहे. नैना म्हणजे सिडकोचे बिना भांडवली स्थापन केलेली कंपनी आहे. तिला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध आहे. नैनाचा अधिकारी यांना २३ गावांमध्ये रीडेव्हलपमेंट बद्दलची माहिती नसल्याने त्यांनी तसे नियोजन केले नाही.

पनवेल: नैना विरोधात ‘गाव बंद’ आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळत असून नैना नकोच, अशी भूमिका शेतकर्‍यांनी घेतलेली आहे. नैना क्षेत्रातील गावामध्ये युडीसीपीआर लागू करावा, अशी मागणी राजेश केणी आणि शेतकर्‍यांनी केली आहे. तसेच ६० टक्के जागा नैनाला देणार नसल्याची भूमिका घेण्यात आली आहे. नैना म्हणजे सिडकोचे बिना भांडवली स्थापन केलेली कंपनी आहे. तिला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध आहे. नैनाचा अधिकारी यांना २३ गावांमध्ये रीडेव्हलपमेंट बद्दलची माहिती नसल्याने त्यांनी तसे नियोजन केले नाही. नैना नियोजन शून्य आहे. सुकापूरला ३० माळ्याच्या ईमारती झाल्या आहेत. मात्र रीडेव्हलपमेंटसाठी ४ ते ५ मजली ईमारत बांधण्यासाठी परवानगी दिली जात नाही. यात कोणता विमान अडकणार आहे का? असा सवाल विचारण्यात आला. नैना मलिदा लाटण्याचा साधन म्हणून आली आहे. आज संघर्ष केला तरच उद्याचा दिवस चांगला येईल. व आंदोलनाचा पाया मजबूत करूया असे यावेळी सांगण्यात आले. जनता हीच ताकद असून जागे व्हा, घरी झोपत बसू नका, क्रिकेट टीमने देखील आंदोलनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. शेतकरी नष्ट करण्याची योजना नैनाची असल्याचं यावेळी सांगण्यात आले. यावेळी विचुंबे ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.

पाणी कुठुन देणार?
नैनामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होणार आहे. त्याचा फायदा तालुक्याला सर्व नागरिकांना समान मिळावा आणि लाखो लोक येथे राहायला आले तर त्यांना पाणी कुठुन देणार, असा सवाल उपस्थित करण्यात आला. नैनाने अद्याप पाण्याची व्यवस्था केलेली नाही. विचुंबे येथील ८० टक्के जागेवर बांधकाम झालेले आहे. येथील बांधकाम परवानगी रद्द करण्यात आलेली असून पूर नियंत्रण पट्टा येथे केले असल्याचे सांगण्यात आले. नदीच्या पलीकडे परवानग्या मिळतात मग आम्हाला परवानगी का मिळत नाही असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. त्यामुळे नैना विरोधात आंदोलन करायचे आहेआणि आपली लढाई आपल्यालाच लढायची आहे. गावातील गुरचरण जागा देखील नैनाला जाणार आहेत. आम्ही गावाच्या जमिनी फूकट द्यायच्या का व पिके घेणारी जमीन देखील जाणार असल्याने येथील शेतकरी उध्वस्त होणार असल्याची भावना शेतकर्‍यांमध्ये व्यक्त होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -