घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रस्वा.सावरकरांचे थीमपार्कसह संग्रहालय साकारले जाणार; पाच कोटींचा निधी मंजूर

स्वा.सावरकरांचे थीमपार्कसह संग्रहालय साकारले जाणार; पाच कोटींचा निधी मंजूर

Subscribe

नाशिक : राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मस्थान असलेल्या भगूर येथे स्वा. सावरकरांचे जीवनकार्य मांडणारे भव्य सावरकर थीमपार्क व आंतरराष्ट्रीय दर्जाचे संग्रहालय उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी रविवारी (दि.२६) केली.

भगूर येथे स्वा. सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त पर्यटन विभागाद्वारा आयोजित पदयात्रा व अभिवादन कार्यक्रमाला संबोधित करताना मंगलप्रभात लोढा यांनी ही घोषणा केली. स्वा. सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त पर्यटन विभागातर्फे भगूर येथे भव्य अभिवादन पदयात्रा व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर विश्व हिंदू परिषदेचे केंद्रिय सदस्य एकनाथ शेटे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सरोज अहिरे, राहुल ढिकले, विवेक व्यासपीठच्या अश्विनी मयेकर, विश्व हिंदू परिषदेचे केंद्रिय सदस्य एकनाथ शेटे, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, लक्ष्मण सावजी, भगूरच्या मुख्याधिकारी निर्मला गायकवाड-पेखळे, भगूर पालिका कार्यालयीन अधीक्षक रमेश राठोड, सामाजिक कार्यकर्त्या सुशीला ओहोळ, अंजू मरकड आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

पर्यटनमंत्री लोढा पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार व जीवनकार्य सर्व भारतीयांसाठी एक प्रेरणा आहे व त्यांचे हे जीवनकार्य, विचार भारतातच नव्हे तर जगभरात पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार प्रयत्नशील आहे. याच अंतर्गत सावरकरांचे जन्मस्थान भगूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे संग्रहालय व भव्य थीम पार्कची उभारणी करण्यात येणार आहे. यात भगूर येथील गेली अनेक वर्षे अपूर्णावस्थेतील थीम पार्क हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आपल्याकडे हस्तांतरित करून घेत असून त्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण होत असल्याची माहिती लोढा यांनी दिली.

दिवसभरात वाड्यात पालकमंत्री दादा भुसे, सचिन ठाकरे, दिनकर आढाव, अजय बोरस्ते, तानाजी करंजकर, तानाजी भोर, भगवान कटारिया, प्रताप गायकवाड, कावेेरी कासार, प्रीतम आढाव, प्रसाद आडके, विलास कुलकर्णी, मधुकर कापसे, अनिल कवडे, जितेंद्र भावसार, विजय सानप, चंद्रशेखर ओहोळ, जीवन गायकवाड, शेखर कस्तुरे, नीलेश हासे, रमेश पवार, मंगेश मरकड, मनोज कुवर, भूषण कापसे, संदीप शेटे, प्रतीक शेटे, मयूर शेटे, ज्ञानेश्वर गायकवाड, प्रमोद शेटे, विष्णू खैरनार, दिलीप सूर्यवंशी, वैभव धात्रक, प्रशांत कापसे, प्रशांत लोया, संभाजी देशमुख, शंकर मुंडारे, अनिकेत कदम, विजय धुमाळ, सोमनाथ बोराडे, योगेश बुरके, सौरव कुलकर्णी, आशिष नेहरे, सचिन झुटे, सीमा साखरे आदींसह सावरकरप्रेमींनी हजेरी लावत अभिवादन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -