घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रदरपत्रक न लावणाऱ्या खाजगी हॉस्पिटलवर महानगरपालिका बडगा उगारण्याच्या तयारीत

दरपत्रक न लावणाऱ्या खाजगी हॉस्पिटलवर महानगरपालिका बडगा उगारण्याच्या तयारीत

Subscribe

नाशिक : शहरातील ३५ नामवंत खासगी रुग्णालयांनी उपचाराचे दरपत्रक दर्शनी भागात न लावल्यामुळे आणि महाराष्ट्र नर्सिंग होम अ‍ॅक्ट कायद्याचे नियमांचे सूचनांचे पालन करत नसल्याने महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी नोटिसा दिल्या आहेत. ३ मार्च २०२३ पर्यंत दर्शनी भागात उपचाराचे दरपत्रक लावण्याच्या सूचना व अहवाल सादर करण्याचे नोटिसीद्वारे बजावण्यात आले आहे. त्यामुळे जनआरोग्य समिती नाशिकच्या पाठपुराव्यास यश आले आहे.

शहरातील ३५ खासगी रुग्णालयांनी रुग्णांच्या उपचाराचे दरपत्रक दर्शनीय भागात न लावल्यामुळे आणि महाराष्ट्र नर्सिंग होम अ‍ॅक्ट कायद्याचे नियमांचे सूचनांचे पालन न केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी शहरातील ३५ नामवंत खासगी रुग्णालयांनी नोटीसद्वारे ३ मार्च २०२३ पर्यंत सर्व खासगी रुग्णालयांमध्ये दर्शनी भागात उपचाराचे दरपत्रक लावण्याच्या सूचना व अहवाल सादर करण्याचे नोटिसीद्वारे बजावण्यात आले आहे. याप्रकरणी जनआरोग्य समिती नाशिकतर्फे निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार ३५ खासगी रुग्णालयांना नोटीसद्वारे ३ मार्च २०२३ पर्यंत दर्शनी भागात उपचाराचे दरपत्रक लावण्याच्या सूचना व अहवाल सादर करण्याचे नोटिसीद्वारे बजावण्यात आले आहे.

- Advertisement -

या नोटिसीमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.जनआरोग्य समिती नाशिक समन्वयक संतोष जाधव, नाशिकरोड समन्वयक गौतम सोनवणे, अ‍ॅड. नाझीमोउद्दीन काझी, अ‍ॅड. निलेश सोनवणे, संगीता कुमावत, अ‍ॅड. सुरेंद्र सोनवणे, अनिल भोंड, मुकुंद रानडे, हिरामण तेलोरे, कृष्णा सिलावट, पद्माकर इंगळे, रवींद्र जगताप, मुकेश बेलदार, कमल मते, शोभा पवार, अनिता पवार, दुर्गा बेलदार, बापूसाहेब गावित, राजेंद्र नानकर, प्रभाकर पेंढारे, फईम शेख, तुळशीराम जाधव आदींनी परिश्रम घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -