रुह बाबा परत येतोय… ‘भूलभुलैया 3’ चा टीझर प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणी यांच्या 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भूल भुलैया 2’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली होती. या चित्रपटाचे यश पाहून चित्रपटच्या निर्मात्यांनी आता याचा तिसरा पार्ट बनवण्याची घोषणा केली आहे. नुकताच या चित्रपटाचा दमदाक टीझर प्रदर्शित केला आहे शिवाय निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची देखील घोषणा केली आहे. 2024 च्या दिवाळीमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

कार्तिक आर्यनने शेअर केला टीझर

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

कार्तिक आर्यनने शेअर केलेल्या टीझरमध्ये कार्तिक आर्यन रुह बाबाच्या भूमिकेत दिसत आहे. या टीझरमध्ये कार्तिक म्हणतोय की, “मी आत्म्यांशी फक्त बोलतचं नाही, ते माझ्या अंगात प्रवेश देखील करतात.” त्यामुळे आता ‘भूल भुलैया 3’ मध्ये कार्तिक आणि आत्मांचा अनोखा खेळ पाहता येईल.

अद्याप निर्मात्यांनी कोणतीही घोषणा केलेली नाही. पण चित्रपटात कार्तिकसोबत छोटे पंडित उर्फ ​​राजपाल यादव आणि कियारा अडवाणी देखील पुन्हा एंट्री करतील. तसेच, या चित्रपटाचे बाकीचे कलाकार देखील यात सहभागी होणार आहेत. दरम्यान, हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक झाले आहेत.

2022 मध्ये सर्वात जास्त कमाई करणारा तिसरा चित्रपट

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीचा ‘भुल भूलैया 2’ चित्रपट 2022 मधील सर्वात जास्त कमाई करणारा तिसरा बॉलिवूड चित्रपट ठरला. तसेच अजय देवगणचा ‘रनवे 34’ , टायगर श्रॉफचा ‘हीरोपंती 2’ आणि कंगना रनौतचा धाकड यांसारखे चित्रपट फ्लॉप झाले. ‘भुल भूलैया 2’मध्ये कार्तिक आणि कियाराची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. या चित्रपटात तब्बू, संजय मिश्रा आणि राजपाल यादव यांसारखे अनेक कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.\


हेही वाचा :

वयाच्या 75 व्या वर्षी देखील मुमताज करतायत जबरदस्त वर्कआऊट; व्हिडीओ व्हायरल