घरमहाराष्ट्रकसब्यात पराभव का झाला? पंकजा मुंडेंनी सांगितलं खरं कारण

कसब्यात पराभव का झाला? पंकजा मुंडेंनी सांगितलं खरं कारण

Subscribe

कसब्यातील ऐतिहासिक निकालावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण येऊ लागले. नुकतंच भाजपच्या फायरब्रँड नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंकजा मुंडेंनी यावर मोठं वक्तव्य केलंय.

काही दिवसांपूर्वी झालेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशा दोन्ही बाजूंना प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला आहे. कसब्यात २८ वर्षांपासूनचा भाजपाचा बालेकिल्ला काँग्रेसनं जिंकला. त्यानंतर कसब्यातील या ऐतिहासिक निकालावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण येऊ लागले. नुकतंच भाजपच्या फायरब्रँड नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंकजा मुंडेंनी यावर मोठं वक्तव्य केलंय. कसब्यात पराभव का झाला यावर बोलताना पंकजा मुंडेंनी यामागचं खरं कारण उलगडलंय.

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलंय. यावर पंकजा मुंडे वेगवेगळ्या विषयावर व्यक्त झाल्या. यावेळी काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या कसबा पोटनिवडणुकीतील पराभावाबाबत पंकजा मुंडेंना प्रश्न केला होता. यावर पंकजा मुंडेंनी निवडणुकीत काय चुकलं यावर चर्चा होते. तिथल्या जनतेचा मुड पहिल्या दिवसापासून वेगळा होता. कसबा हारणं हे आमच्यासाठी वेदनादायी आहे, असं म्हणत पंकजा मुंडेंनी आपली खंत व्यक्त केली.

- Advertisement -

निवडणुकीत जेव्हा एखादा विजय होतो. तेव्हा कोणत्या गोष्टी योग्य घडल्या यावर चर्चा होताना दिसत नाही. पण निवडणूकीत कुठे चुकलं यावर मात्र आवर्जून चर्चा होते. ही चर्चा हवी, जेणेकरून भविष्यात होणाऱ्या चुका टाळता येऊ शकतील. तिथल्या जनतेचा जो मुड होता तिथल्या जनतेचा तो पहिल्याच दिवसापासनं हीच चर्चा होत होती की कसबा अवघड आहे. कसबा अवघड आहे, कसबा अवघड आहे ही चर्चा होती. कसबा हारणं हे आमच्यासाठी पण तेवढंच वेदनादायी आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

यापुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, कसब्याचं सध्याचा जो पॅटर्न आहे, सोशल इंजिनिअरिंग आहे, ते पहिल्या कसब्यामध्ये आणि आताच्या कसब्यात फरक आहे. त्याच्यामुळे नक्कीच कसबा हरलो याचा विचार करता त्या फॅब्रिकचा विचार केला पाहिजे. पिंपरी-चिंचवड ही जिंकलो तर त्याच्यामुळे असं नाही की संपूर्णतः नकारात्मक निर्णय आलेला आहे. निवडणूक जेव्हा लढायला आपण जातो तर निवडणूक कधीही अवघडच वाटत असते, असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या.

- Advertisement -

योगायोगाने आम्ही सत्तेत होतो. बलाढ्य नेते आमच्या पक्षात होते. त्यामुळे ते बलाढ्य नेते सगळे तिथे दिसले. पण बाकीच्या पक्षांचे सर्व महत्वाचे नेते तिथे आले आणि त्यांनी प्रयत्न केले, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. आता आमची हार झाली ही स्वीकारली पाहिजे आणि का झाली? याचा विचार केला पाहिजे, त्याचा परिणाम राज्याच्या राजकारणावर काय होतो? याचंही आम्ही अंतर्मुख होऊन किंवा वरिष्ठांनी विचार करुन भविष्यामधले निर्णय घेतले पाहिजेत, असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -