घरमहाराष्ट्रशीतल म्हात्रे मॉर्फ व्हिडीओ; नितेश राणेंचा ठाकरे गटावर निशाणा

शीतल म्हात्रे मॉर्फ व्हिडीओ; नितेश राणेंचा ठाकरे गटावर निशाणा

Subscribe

तुम्ही जर व्हिडीओ बाहेर काढत असाल तर आमच्याकडेही रात्री साडेसात नंतरचे काही व्हिडीओ आहेत. ते आम्ही बाहेर काढू. त्यामुळे तुम्ही सुरुवात केलीत तर त्याचा शेवट आम्हाला करता येतो, असा इशाराही आमदार राणे यांनी दिला.

मुंबईः शीतल म्हात्रे यांच्या मार्फ व्हिडीओ व्हायरल प्रकरणी आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. या घटनेचा मास्टरमाईंड कलानगरमध्ये बसला आहे. जर या घटनेसाठी युवासेनेचे पदाधिकारी दोषी असतील तर युवासेनेच्या प्रमुखांनी याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी आमदार राणे यांनी केली.

पुढे आमदार राणे म्हणाले, या घटनेबाबत कारवाई करत पोलिसांनी मानस कुंवर आणि अशोक मिश्रा यांना अटक केली आहे. हे दोघेही ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे शीतल म्हात्रेंची नाहक बदनामी केली जात आहे. जे ठाकरे गटासोबत राहतील ते चांगले आणि जे सोडून गेले त्यांची बदनामी करण्याचा हा डाव आहे.

- Advertisement -

तुम्ही जर व्हिडीओ बाहेर काढत असाल तर आमच्याकडेही रात्री साडेसात नंतरचे काही व्हिडीओ आहेत. ते आम्ही बाहेर काढू. त्यामुळे तुम्ही सुरुवात केलीत तर त्याचा शेवट आम्हाला करता येतो, असा इशाराही आमदार राणे यांनी दिला.

या घटनेचे निवदेन गृहराज्य मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानसभेत सादर केले. व्हिडिओ मॉर्फिंग केल्याप्रकरणी वरीष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्त्वात विशेष तपास पथक(एसआयटी) स्थापन करण्यात आली आहे, अशी घोषणाही मंत्री देसाई यांनी विधानसभेत केली. यातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

आरोपी विनायक डावरे हा ठाकरे गटाचा सोशल मीडिया महाराष्ट्र समन्वयक आहे. त्याने हा व्हिडिओ मातोश्री फेसबुक पेजवरून व्हायरल केला. इतर आरोपींनीही तो व्हिडिओ व्हायरल केला, अशी कबुली दिली आहे. त्यानुसार गुन्हा नोंदवून तपास सुरु आहे. याच्या तपासासाठी माहिती आणि तंत्रज्ञान व सायबर सेलची सहा पथके स्थापन करण्यात आली आहेत. याचा सखोल तपास सुरु आहे. मात्र असे प्रकार टाळता यावे यासाठी ठोस पावले उचलायला हवीत. म्हणूनच वरीष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्त्वात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे, असे मंत्री शंभुराज देसाई यांनी स्पष्ट केले.

हेही वाचाः शीतल तू लढ… यांना सोडू नका, मास्टर माईंडचा शोध घ्या! चित्रा वाघ भडकल्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -