घरमहाराष्ट्रशीतल तू लढ... यांना सोडू नका, मास्टर माईंडचा शोध घ्या! चित्रा वाघ...

शीतल तू लढ… यांना सोडू नका, मास्टर माईंडचा शोध घ्या! चित्रा वाघ भडकल्या

Subscribe

चित्रा वाघ यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये चित्रा वाघ म्हणाल्या की....

शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे राजकीय वातावरण तापलं असून आरोप प्रत्यारोपांना उधाण आलं आहे. त्यावरून ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगलेल्या आहेत. यात आता भाजपच्या चित्रा वाघ यांनी देखील उडी घेतलीय. शितल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणावरून चित्रा वाघ चांगल्याच भडकल्या. तसंच या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या हरामखोरांना सोडू नका आणि यामागचा कर्ता करविता धनी कोण आहे? हे शोधून काढा’, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या व्हायरल व्हिडीओवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. शिवसेना आणि भाजप आमदार, महिला नेत्या पुढे येऊन शीतल म्हात्रे यांच्या पाठिशी उभं असल्याचं सांगत आहेत. भाजप भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्र वाघ यांनी सुद्धा या भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्र वाघ यांनी या व्हायरल व्हिडीओवरून आपला संताप व्यक्त केलाय.

- Advertisement -

चित्रा वाघ यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये चित्रा वाघ म्हणाल्या की, राजकारणात काम करणाऱ्या महिलांना कशा पद्धतीने त्रास दिला जातो, हे आपण आजपर्यंत पाहिलं आहे. पण आता विकृतीने कळस गाठला आहे. आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांचा मॉर्फ केलेला व्हिडिओ व्ह्ययरल होत आहे. एखाद्या बाईला थांबवू शकत नाही, मग तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचे, अशा पद्धतीचे विकृती व्हिडिओ बनवले जातात आणि तिची बदनामी केली जाते. हा प्रश्न एका शीतल म्हात्रेचा नाहीए, शीतल सारख्या हजारो महिला राजकारणात काम करतात. आज तिचा नंबर आहे, उद्या आमचा नंबर असले, त्यामुळे हा लढा सर्वांनी मिळून लढला पाहिजे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. पण याचा करविता आणि बोलविता धनी कोण आहे? असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. यामागे असलेल्या कर्ता करविता धनीला शोधून काढा आणि त्याच्यावर कारवाई करा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केलीय.

- Advertisement -

हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी एक कॅप्शन देत मुंबई पोलिसांना देखील टॅग केलंय. “शितल…..तू लढ आम्ही सगळ्या तुझ्या सोबत आहोत. हा विषय फक्त शितल पुरता मर्यादीत नाहीचं राजकारणात काम करणाऱ्या कुठल्याही महिलेसोबत भविष्यात या गोष्टी घडू शकतील. @MumbaiPolice ना आवाहन आहे या हरामखोरांना सोडू नकाचं पण यांचा करविता धनी कोण आहे त्याला शोधून काढत त्याच्या आधी मुसक्या आवळा”, असं यात लिहिलंय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -