घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रगोपीनाथ मुंडे स्मारकासाठी आदित्य ठाकरे यांचे योगदान : संजय राऊत

गोपीनाथ मुंडे स्मारकासाठी आदित्य ठाकरे यांचे योगदान : संजय राऊत

Subscribe

नाशिक : जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे याठिकाणी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा तसेच स्मारकाचे शनिवारी (दी.१८) लोकार्पण होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते स्मारकाचे उद्घाटन होईल. याबाबत बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्या स्मारकासाठी आदित्य ठाकरे यांचे योगदान असल्याचे म्हंटले आहे.

आदित्य ठाकरे महाविकास आघाडी सरकारच्या काळात कॅबिनेट मंत्री असताना त्यांच्याकडे पर्यटन विकास विभागाची जबाबदारी होती. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी नांदूर शिंगोटे येथे उभारलेल्या लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी पर्यटन विकास अंतर्गत निधी उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे तो पुतळा तसेच स्मारकाच्या उभारणीत त्यांचे योगदान मोठे असल्याचे संजय राऊत यांनी म्हंटले आहे. यामागे प्रमुख कारण म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि शिवसेना यात एक वेगळे नाते होते. गोपीनाथराव मुंडे या महाराष्ट्राचे एक महत्वपूर्ण लोकनेते होते. या राज्यात शिवसेना भाजपा युती टिकावी यासाठी त्यांचे योगदान मोठे होते असेही यावेळी राऊत म्हणाले.

- Advertisement -
लोकार्पण कार्यक्रमाला नेत्यांची मांदियाळी 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील. तसेच सोहळ्याचे यजमान पद पालकमंत्री दादा भुसे भूषविणार असून, प्रमुख अतिथी म्हणून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सुभाष भामरे, खा. सुजय विखे-पाटील, आ. जितेंद्र आव्हाड, आ. सुहास कांदे, आ. माणिक कोकाटे, आ. सीमा हिरे, आ. देवयानी फरांदे, आ. राहुल ढिकले, आ. सत्यजित तांबे, आ. राहुल आहेर, आ. नरेंद्र दराडे, आ.किशोर दराडे, आ.नरहरी
झिरवळ, आ.दिलीप बोरसे, आ.नितीन पवार आदी उपस्थित राहणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -