घरताज्या घडामोडीही चांगली गोष्ट नाही बरं का...महाराष्ट्रासाठी! मनसेचा गुढीपाडवा मेळाव्याचा दुसरा टीझर लॉन्च

ही चांगली गोष्ट नाही बरं का…महाराष्ट्रासाठी! मनसेचा गुढीपाडवा मेळाव्याचा दुसरा टीझर लॉन्च

Subscribe

महाराष्ट्रातील राजकारणाला दिवसेंदिवस वेगळे वळण लागल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. दररोज नेतेमंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातील राजकारणाला दिवसेंदिवस वेगळे वळण लागल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. दररोज नेतेमंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. येत्या गुढी पाडव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसे अधिकृत या ट्विटर अकाऊंटवर एक टीझर शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील राजकारणावर टीका केली आहे. (Mns Padwa Rally Teaser Launch Raj Thackeray)

येत्या गुढी पाडव्याला मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याचा टिझर मनसेकडून लॉन्च करण्यात आल आहे. यामध्ये गेल्या दोन वर्षातील महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करण्यात आले आहे.

- Advertisement -

मनसेच्या टीझरमध्ये नेमके काय?

चाळीस सेकंदा टीझर ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या टिझरमध्ये सुरुवातीला विधानभवनाच्या फोटोच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या आवाजात एक ऑडिओ सुरु आहे. या ऑडितील शब्द अक्षरात दिसत असून, त्यात म्हटलं की, गेले दोन अडीच वर्षे महाराष्ट्रात जे राजकारण सुरु आहे ना ही चांगली गोष्ट नाही बरं का…महाराष्ट्रासाठी! असं महाराष्ट्रात कधीही नव्हतं. हेच खरं राजकारणं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे राजकारण नव्हे! त्यानंतर पुढे राज ठाकरेंच्या फोटोसह ‘महाराष्ट्रालाच नव्हे तर राजकारणालाही नवनिर्माणाची गरज…’ असल्याचं टायटल दिसतं. तसंच पुढे ‘चला शीवतीर्थावर!’ असं आवाहनही मनसेच्यावतीनं करण्यात आलं आहे.

- Advertisement -

“महाराष्ट्राच्या मनातील खदखद व्यक्त करणाऱ्या नेत्याचे विचार ऐकण्यासाठी चला शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळावा, २२ मार्च २०२३ सायं. ६ वा, छत्रपती शिवाजी महाराज पार्क, मुंबई”, असे शेअर करण्यात आलेल्या टीझरला कॅप्शन देण्यात आले आहे.


हेही वाचा – पक्षश्रेष्ठींनी त्यांना समज द्यावी; बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय गायकवाडांचा संताप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -