घरपालघरअपर तहसीलदारचा कारनामा, सीआरझेड भागात उत्खनन व भरणी परवानगी

अपर तहसीलदारचा कारनामा, सीआरझेड भागात उत्खनन व भरणी परवानगी

Subscribe

त्यांनी अपर जिल्हाधिकार्‍यांमार्फत याची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले तसेच चुकीचे आढळल्यास कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले.

भाईंदर :- मीरा- भाईंदर अपर तहसीलदार नंदकुमार देशमुख हे सीआरझेड व कांदळवन भागात उत्खनन व भरणी करण्याची परवानगी देत सीआरझेडच्या मुळावर उठले असल्याचा आरोप रीत याची तक्रार जिल्हाधिकारी ठाणे अशोक शिनगारे यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यांनी अपर जिल्हाधिकार्‍यांमार्फत याची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले तसेच चुकीचे आढळल्यास कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले.

सध्या मीरा- भाईंदर शहरात भरणीचा सुळसुळाट सुरू असून भरणी माफियांनी उच्छाद मांडला आहे. त्यांनी नवघर गावाच्या पाठीमागील व इंद्रलोक पोलीस चौकीच्या समोर भागातील सीआरझेड भागात असलेल्या ठिकाणी नैसर्गिक असलेला तलाव लुणार लेक येथील सर्व्हे क्रं. १४ ( २०८), १६ (२१०) व शेजारील सर्व्हे क्रमांकात असलेला जागेवर भरणी करून तलाव नष्ट केला आहे. तर दुसरीकडे सर्व्हे क्रं. २६ (२३४), २७ (२२९), २५ (२३३) या ठिकाणी बिल्डर मनोज पुरोहित यांनी सात ते आठ एकर वर भरणी करून पालिकेचा नैसर्गिक वाहणारा नाला सुद्धा वळविला आहे. आणि त्याठिकाणी विकासकांनी मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे व शेड उभारून करून औद्योगिक वसाहत निर्माण केली आहे, त्याठिकाणी त्यांनी कांदळवनाची झाडांची बेसुमार कत्तल करत काही झाडे जाळल्याचा प्रकारही झाला आहे. तसेच भाईंदर पश्चिमेच्या राधा स्वामी सत्संगच्या पाठीमागे गुन्हा दाखल असलेल्या कांदळवन क्षेत्रात भरणी सुरू आहे.
मागेच हरित लवाद न्यायालयाने सीआरझेड व मँग्रोव्ह जागेत शासनाच्या पर्यावरण विभागाची परवानगी घेतल्यानंतरच त्याठिकाणी गौण खनिजांची परवानगी दिली जाऊ नये असे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशाने ज्याठिकाणी बेकायदा झालेले भराव काढून ती जागा पूर्ववत करण्यासाठी आदेश दिले असताना आणि त्याठिकाणी पर्यावरण कायद्याखाली गुन्हे दाखल असतानाही परवानगीचा खेळ सुरू आहे.

- Advertisement -

सीआरझेड जागेत परवानगी देता येत नाही. तरीही मीरा -भाईंदर अपर तहसीलदार यांनी उत्खनन व भरणी करण्याची परवानगी दिली असेल तर सदरील प्रकरणांची चौकशी अपर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत करण्यात येईल.

– अशोक शिनगारे, जिल्हाधिकारी ठाणे

- Advertisement -

 

मीरा- भाईंदर अपर तहसीलदार यांच्या बाबतीत भरपूर तक्रारी वाढल्या आहेत. तसेच अपर तहसीलदार यांना सद्यस्थितीत प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्यास सांगून बेकायदा भरणी थांबवून कारवाई करण्यास कळवितो.

– अविनाश शिंदे, उपजिल्हाधिकारी ठाणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -