घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

मग ते वेळीं हियें फुटावें । आतां लाठेपणें कां न झुंजावें? । हें जिंतलें तरी भोगावें महीतळ ॥
ते मर्मभेदक शब्द ऐकून मग दुःखी होण्यापेक्षा आता शौर्याने का युद्ध करू नये? जर यांना तू जिंकलेस तर पृथ्वीचे राज्य भोगशील.
ना तरी रणीं एथ । झुंजतां वेंचलें जीवित । तरी स्वर्गसुख अनकळित । पावसील ॥
या रणांगणामध्ये युद्ध करताना तू मेलास, तर स्वर्गसुख भोगशील;
म्हणौनि ये गोठी । विचारू न करी किरीटी । आतां धनुष्य घेऊनि उठी । झुंजै वेगीं ॥
म्हणून अर्जुना, याबद्दल आता विचार करीत बसू नको; तर ऊठ आणि हातात धनुष्य घेऊन युद्धास सिद्ध हो.
देखैं स्वधर्मु हा आचरतां । दोषु नाशे असतां । तुज भ्रांति हे कवण चित्ता । पातकाची? ॥
हे पहा स्वधर्माचे आचरण केले तर असलेले दोष नाश पावतात, असे असून त्याच्यापासून पातक लागेल हा भ्रम तुझ्या मनात कोठून उत्पन्न झाला?
सांगैं प्लवेंचि काय बुडिजे । कां मार्गीं जातां आडळिजे । परी विपायें चालों नेणिजे । तरी तेंही घडे ॥
तूच सांग की, नाव कधी बुडेल का त्याचप्रमाणे चांगल्या रस्त्याने जाणारा कधी ठेच लागून पडेल का? परंतु ज्याला चालता येत नाही, तो मात्र कदाचित ठेच लागून पडण्याचा संभव आहे.
अमृतें तरीच मरिजे । जरी विखेंसि सेविजे । तैसा स्वधर्मीं दोषु पाविजे । हेतुकपणें ॥
दूध प्याल्याने मरण येणार नाही; परंतु ते विषाबरोबर सेवन केल्यास तो सेवन करणारा मरेल; त्याचप्रमाणे फळाच्या आशेने स्वधर्माचे आचरण केल्यास मात्र दोष लागतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -