घरमहाराष्ट्र...तर मोदींसहित भाजपाचे अनेक नेते जन्मठेपेत जातील, राहुल गांधींच्या शिक्षेवरून काँग्रेसची प्रतिक्रिया

…तर मोदींसहित भाजपाचे अनेक नेते जन्मठेपेत जातील, राहुल गांधींच्या शिक्षेवरून काँग्रेसची प्रतिक्रिया

Subscribe

मुंबई : सुमारे तीन वर्षांपूर्वी मोदी आडनावावरून केलेल्या टिप्पणीवरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सुरतच्या न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे त्यावरून राजकीय वातावरण तापले असून काँग्रेसकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. याच न्यायाने मोदींसहित भाजपाचे अनेक नेत्यांना जन्मठेप होऊ शकते, अशी प्रतिक्रिया राज्यातील काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी दिली आहे.

“सर्व चोरांची आडनावे मोदी कशी आहेत?” असे राहुल गांधी यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कर्नाटकातील कोलारमध्ये म्हटले होते. राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर सुरत पश्चिमेतील भाजपा आमदार पूर्णेश मोदी यांनी त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल गांधी यांनी मोदी समाजाचा अपमान केल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. यानंतर हे प्रकरण सुरतच्या न्यायालयात पोहोचले. या प्रकरणात राहुल गांधी यांना याआधी 9 जुलै 2020 रोजी सुरत न्यायालयात हजर राहावे लागले होते. तर गेल्या महिन्यात पूर्णेश मोदी यांनी या प्रकरणी लवकर निर्णय घेण्यासाठी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर उच्च न्यायालयाने सुरत न्यायालयाला लवकरात लवकर सुनावणी घेण्याचे आदेश देताना उच्च न्यायालयात सुनावणीसाठी केलेला अर्ज फेटाळला होता.

- Advertisement -

मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांनी या प्रकरणाच्या निकालासाठी 23 मार्च ही तारीख निश्चित केली होती. त्यानुसार आज, गुरुवारी सुनावणी करत राहुल गांधी यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. तथापि, ही शिक्षा सुनावतानाच राहुल गांधी यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देखील मंजूर करण्यात आला.

- Advertisement -

या सर्व प्रकरणावरून काँग्रेक आक्रमक झाली असून ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत. राज्यातील काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी देखील ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे. एखाद्या राजकीय विधानावर दोन वर्षांची शिक्षा केवळ मोदींच्या न्यू इंडियात होऊ शकते… याच कारणामुळे खरे तर मोदींसहित भाजपाचे अनेक नेते जन्मठेपेत जातील, असे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -