घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023आपले सरकार आल्यावर विकासाच्या विमानाने टेक ऑफ घेतला, मुख्यमंत्र्यांची ठाकरे सरकारवर टीका

आपले सरकार आल्यावर विकासाच्या विमानाने टेक ऑफ घेतला, मुख्यमंत्र्यांची ठाकरे सरकारवर टीका

Subscribe

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे आज, शनिवारी सूप वाजले. अखेरच्या दिवशी भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. गेल्या अडीच वर्षांत रनवेवर रुतलेल्या विकासाच्या विमानाने आपले सरकार आल्यावर टेक ऑफ घेतला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

सर्वसमावेशक विकासाची संकल्पना घेऊन काम कऱणारे आपले सरकार असून पायाभूत सुविधा, कृषी, सामाजिक न्याय, महिला, आदिवासी शिक्षण आदी विविध क्षेत्रांमध्ये विकास केला आहे. महाराष्ट्राच्या विकासाचे ध्येय घेऊन काम करणारे हे सरकार आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या अडीच वर्षांत आडमुठ्या आणि अहंकारी धोरणामुळे विकासाचे विमान एअरपोर्टच्या रनवेवर रुतले होतं. मात्र आपले सरकार आल्यानंतर विकासाच्या विमानाने टेक ऑफ घेतला आहे. त्यामुळे अनेकांना पोटदुखी होते आहे.

- Advertisement -

गेल्या नऊ महिन्यांत सरकारने एवढे निर्णय घेतले, ते सर्व लोकांसमोर आहेत. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. ज्येष्ठ नागरिक, महिलांना एसटीमध्ये सवलत दिली. पंचामृतच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत सरकार पोहोचणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
एका व्यक्तीच्या अहंकारामुळे राज्यातले प्रकल्प रखडले होते, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अडीच वर्षे प्रकल्प रखडल्याने तुम्ही राज्याला 10 वर्षे मागे नेले आहे. आम्ही या रखडलेल्या प्रकल्पांना गती दिली. समृद्धी महामार्गाद्वारे राज्याचा विकासपथ तयार केला. मेट्रोच्या कामालाही गती दिली. आरे कारशेड, मेट्रो तीनचा विषय कोणामुळे थांबले होते? हे आपल्याला माहीत आहे. पण आपण तत्काळ निर्णय घेऊन त्वरित सुरू केले. वेळ वाढला असता तर, हजारो कोटी रुपये जास्तीचे लागले असते. पण सरकारने या कामांना वेग दिला, असे शिंदे म्हणाले.

- Advertisement -

बुलेट ट्रेनचा विषय अडीच वर्षे कुणी थांबवला? का थांबवला? हेही सर्वांना माहीत आहे. मुंबईच्या दृष्टीने एवढा मोठा प्रकल्प असूनही काहींनी त्यात खोडा घातला. आपले सरकार आल्यानंतर हा प्रकल्प वेगाने पुढे जातो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जे स्वप्न आहे, ते आम्ही पूर्ण करणार आहोत, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -