घरराजकारणराहुल गांधींचे सावरकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य; आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...

राहुल गांधींचे सावरकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य; आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले…

Subscribe

अनेक पक्षाच्या वेगवेगळ्या भुमिका आहेत. तशी काॅंग्रेसची देखील एक भूमिका आहे. पण आम्हाला सावरकरांबाबत त्यांची भूमिका मान्य नाही- आदित्य ठाकरे

काॅंग्रेस नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यांना पत्रकार परिषदेदरम्यान, विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आता यावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

आदित्य ठाकरे काय म्हणाले ?

राहुल गांधी यांच्या विधानानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनेक पक्षाच्या वेगवेगळ्या भुमिका आहेत. तशी काॅंग्रेसची देखील एक भूमिका आहे. पण आम्हाला सावरकरांबाबत त्यांची भूमिका मान्य नाही. जसे भाजप पीडीपीसोबत गेली तेसुद्धा आम्हाला मान्य नव्हते, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपवरच निशाणा साधला आहे. प्रत्येकाचा विचार वेगळा आहे. ही लोकशाहीसाठी असलेली लढाई आहे, असे ठाकरे यावेळी म्हणाले.

- Advertisement -

सावरकरांबाबत काय म्हणाले राहुल गांधी ?

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांना एका पत्रकाराने लंडनमध्ये दिलेल्या भाषणाबाबत प्रश्न विचारला. त्यावरुन राहुल गांधी चांगलेच संतापले.

तसेच, भाजप नेते तुम्हाला संसदेत माफी मागायला सांगत होते, तुम्ही माफी का नाही मागितली? असा प्रश्न पत्रकारांकडून राहुल गांधी यांना करण्यात आला. त्यावर उत्तर देताना, राहुल गांधी म्हणाले की, राहुल गांधींना वाटते की माझे नाव सावरकर नाही, माझे नाव गांधी आहे. गांधी कोणाची माफी मागत नाहीत, असे उत्तर दिले.

- Advertisement -

( हेही वाचा: राहुल गांधींवरील कारवाई चुकीची; एवढी घाई करण्याची गरज नव्हती- बच्चू कडू )

राहुल गांधी पुढे म्हणाले की, मी प्रश्न विचारणे सोडणार नाही. गौतम अदानी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काय संबंध आहे. हे समजले पाहिजे. मी या लोकांना घाबरत नाही. जर त्यांना वाटत असेल की माझी खासदारकी रद्द करुन, धमकावून, मला तुरुंगात पाठवून ते मला बंद करु शकतात. पण, मी भारताच्या लोकशाहीसाठी लढत आहे आणि लढत राहीन, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -