घरताज्या घडामोडीनिवडणुका लागू द्या मग... अजित पवारांच्या बॅनरवरून जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

निवडणुका लागू द्या मग… अजित पवारांच्या बॅनरवरून जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मागील काही दिवसांपासून भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर झळकावण्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उत्साही कार्यकर्त्यांनी त्यांचे मुंबईत भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा नाशिकमध्ये अजित पवार भावी मुख्यमंत्री असे बॅनर भरसभेत झळकले आहेत.

अजित पवार भावी मुख्यमंत्री असं बॅनर नाशिकमध्ये झळकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या बॅनरवरून भाष्य केलं आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात विरोधी पक्षनेते अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड हे उपस्थित होते. यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मुख्यमंत्री कुठेही गेले तरी म्हणतात सहा महिन्यापूर्वी मी बॅटिंग केली. पण तुम्ही खंजीर खुपसला. महिलेला बाजूला सरकावले तरी 354, आमच्या मुलांनी फटके मारले तर 307 असा न्याय सुरू आहे. 50 खोके म्हटलेलं तुम्हाला का लागतय? असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी 50 खोकेच्या घोषणा दिल्या.

- Advertisement -

कधी निवडणुका लागतात याची जनता वाट बघत आहे. कधी तुम्ही मैदानात येता. यावेळी निवडणुका लागू द्या मग अजित दादा मुख्यमंत्री होतील, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्याबद्दल काय म्हटले? हे सरकार नपुंसक आहे. जाती धर्मात तेढ लावून आपले हित साध्य करायचे काम सुरू आहे.

हिंदूंना भडकवण्यासाठी हिंदू मोर्चा निघत आहेत. अजित पवार किंवा आम्ही सत्तेत असताना असे कधी झाले का? तुमच्या सरकारमध्ये हिंदू सुरक्षित नाही असे का?, असा सवाल उपस्थित करत पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री आणि अजित पवारांना उपमुख्यमंत्री करा, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली.

- Advertisement -

हेही वाचा : निवृत्तींच्या बातम्यांवर गडकरी संतापले, म्हणाले – मीडियाने जबाबदारीने बातम्या


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -