घरमहाराष्ट्रसावरकरांचा अपमान खपवून घेणार नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला सज्जड इशारा

सावरकरांचा अपमान खपवून घेणार नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला सज्जड इशारा

Subscribe

 

ठाणेः स्वांतत्र्यवीर सावरकर यांचा अपमान म्हणजे देशाचा अपमान आहे. मी आणि माझे आमदार स्वातंत्र्यावीर सावरकरांचा अपमान खपवून घेणार नाही, असा सज्जड दम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिला आहे.

- Advertisement -

ठाणे येथे सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. या यात्रेत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सावरकरांच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांना सज्जड दमच दिला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सावरकर यांनी देशाच्या स्वांतत्र्यासाठी हालअपेष्टा सहन केल्या. तुरुंगवास भोगला. अशा स्वांतत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांच्यासारख्या प्रवृत्तींचा मी धिक्कार करतो. सावरकर हे कट्टर हिंदुत्त्ववादी होते. देशभक्त होते. त्यांचे कार्य सर्व दूर पोहोचवण्यासाठीच भाजप आणि शिवसेनेने सावरकर गौरव यात्रा काढली आहे.

गेल्या काही वर्षात हिंदुंबद्दल अफवा पसरवली जात होती. हिंदुत्त्वाबद्दल बोलू दिले जात नव्हते. मात्र २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आले आणि हिंदुत्त्वाला बळ मिळाले. आमचा कोणत्याही जाती धर्माला विरोध नाही. पण सावरकरांचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही. बाळासाहेब ठाकरे हे या देशातील पहिले नेते होते ज्यांनी सांगितले की गर्व से कहो हम हिंदु है. सावरकरांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला बाळासाहेबांनी जोडे मारले होते. आणि आता सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे मांडीला मांडी लावून बसत आहेत. याची लोकांच्या मनात चिड आहे. रोष आहे. हा रोष आणि चिड व्यक्त करण्यासाठीच ही यात्रा काढण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

संपूर्ण राज्यभर शिवसेना-भाजपची गौरव यात्रा निघणार आहे. आज मुंबई ठाण्यात ही गौरव यात्रा निघाली. मुंबईत दादर शिवाजी पार्क येथे गौरव यात्रा निघाली. या यात्रेत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, आमदार सदा सरवणकर सहभागी झाले होते. शिवसेना भवनजवळून ही यात्रा काढण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -