घरभक्तीChaitra Purnima 2023: कधी आहे चैत्र पौर्णिमा? जाणून घ्या नेमकी तारीख आणि तिथी

Chaitra Purnima 2023: कधी आहे चैत्र पौर्णिमा? जाणून घ्या नेमकी तारीख आणि तिथी

Subscribe

हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. या दिवशी चंद्राची तसेच श्रीविष्णू आणि लक्ष्मीची पूजा केली जाते. येत्या 5 एप्रिल रोजी हिंदू नववर्षातील पहिली पौर्णिमा साजरी केली जाईल. या चैत्र महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला चैत्र पौर्णिमा म्हटलं जातं. चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती देखील असते. त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.

चैत्र पौर्णिमा तिथी

हिंदू पंचांगानुसार, या वर्षी चैत्र पौर्णिमा 5 एप्रिल 2023 रोजी सकाळी 09.19 वाजता सुरू होईल आणि 06 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10.04 वाजता समाप्त होईल. त्यामुळे यंदा चैत्र पौर्णिमेची पूजा 5 एप्रिल 2023 रोजी करण्यात येणार आहे. तसेच हनुमान जन्मोत्सव 6 एप्रिल 2023 रोजीच साजरा केला जाईल.

- Advertisement -

चैत्र पौर्णिमा पूजा विधी

  • चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून कोणत्याही नदीमध्ये स्नान करा. जवळपास नदी नसल्यास घरीच पाण्यात गंगा जल टाकून स्नान करा.
  • त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करुन सूर्याला अर्घ्य अर्पण करा.
  • त्यानंतर घरातील देवी-देवतांची पूजा करा.
  • गरीब, गरजू लोकांना दान द्या.
  • या दिवशी शक्य असल्यास घरामध्ये श्री सत्य नारायणाची पूजा करा. कथेचे वाचन करा.
  • तसेच श्री विष्णू सहस्त्रनाम आणि नारायण मंत्राचा जप करा.

चैत्र पौर्णिमेचे महत्त्व

पौराणिक कथेनुसार, त्रेतायुगात चैत्र पौर्णिमेला, श्री रामाचे परम भक्त, हनुमानांचा जन्म अंजनीच्या पोटी झाला. द्वापार युगात त्याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने ब्रजमध्ये गोपींसोबत रास रचला. असे मानले जाते की, चैत्र पौर्णिमेला रात्री लक्ष्मीची पूजा करणाऱ्यांचे घर धनधान्याने भरलेले असते. तर या दिवशी तीळ, पाणी, वस्त्र, धान्य दान करणाऱ्यांचे सर्व संकट नष्ट होतात.

- Advertisement -

हेही वाचा : 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -