घरताज्या घडामोडीपुण्यात ऊन-पावसाचा खेळ, पण नागरिकांना आरोग्याची भीती

पुण्यात ऊन-पावसाचा खेळ, पण नागरिकांना आरोग्याची भीती

Subscribe

मागील काही दिवसांपासून पुणे शहराचा पारा वाढत चालला आहे. उष्णतेत वाढत होत असल्याने पुणेकरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो आहे. मात्र एकीकडे उष्णता तर, दुसरीकडे पुण्याच पावसाचीही शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून पुणे शहराचा पारा वाढत चालला आहे. उष्णतेत वाढत होत असल्याने पुणेकरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो आहे. मात्र एकीकडे उष्णता तर, दुसरीकडे पुण्याच पावसाचीही शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार पुण्यात 7, 8, व 9 एप्रिल रोजी विजांच्या कडाक्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. (Meteorological Department warns of unseasonal rain with lightning for the next three days in Pune vvp96)

ढगाळ वातावरण व अवकाळी पाऊस असतानाही पुणे शहरातील तापमान वाढल्यानं वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. पुणे शहरात व जिल्ह्यांत 7, 8, 9 तारखेला विजांच्या कडकडासह शहरात हलक्या पावसाची शक्यता आहे.

- Advertisement -

पुणेकरांना सतावतेय आरोग्याची भीती

सकाळी थंडी आणि दुपारी कडाक्याच्या उन्हाचा सामना सध्या पुणेकर करत आहे. दिवसभरात तापमानात तब्बल 20 ते 25 अंशांचा फरक पडत असल्यामुळे अनेक पुणेकर हैराण झालं आहेत. अशातच पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवल्याने पुणेकरांना आरोग्याची भीती वाटत आहे.

- Advertisement -

पुढील चार दिवस राज्यात अवकाळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. आता एप्रिलमध्येही पावसाचे संकट कायम आहे.

दरम्यान, पुण्यात सरासरी कमाल तापमान 40.2 अंश सेल्सिअस नोंदवले जात आहे. राज्यातील सर्वाधिक तापामानात पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर हॉट सीटी अशी ओखळ असणारं शहर म्हणजेच चंद्रपूर (Chandrapur) हे पहिल्या क्रमांकावर आहे. चंद्रपूरात 40.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आहे

राज्यात अवकाळी पावसाची शक्यता

6 तारखेला सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात विजांच्या कडकटासह अवकाळी पाऊस पडणार आहे. त्यानंतर 7, 8 आणि 9 तारखेलाही राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे.


हेही वाचा – CNG, PNG होणार स्वस्त? सर्वसामान्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -