घरदेश-विदेशMedical Education : युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांना भारतातून देता येईल मुख्य परीक्षा

Medical Education : युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांना भारतातून देता येईल मुख्य परीक्षा

Subscribe

नवी दिल्ली : रशियासोबत युद्ध सुरू झाल्यानंतर युक्रेनमधून मायदेशी परतलेल्या मेडिकलच्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. या विद्यार्थ्यांना आपल्या मुख्य परीक्षेसाठी युक्रेनला जाण्याची गरज नाही. या भारतीय विद्यार्थ्यांना येथे राहूनच युक्रेनमधील विद्यापीठांच्या मुख्य परीक्षा देता येतील. भारतीय विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा भारतातूनच देण्याची परवानगी दिली असल्याची घोषणा युक्रेन सरकारने केली आहे.

- Advertisement -

रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान ऑपरेशन गंगा अंतर्गत हे विद्यार्थी भारतात परतले होते. युक्रेनचे उप-परराष्ट्रमंत्री एमीन झापरोवा यांनी आपल्या तीन दिवसांच्या नवी दिल्ली दौऱ्यात ही माहिती भारताला दिली. मेडिकलच्या परदेशी विद्यार्थ्यांना त्यांच्याच देशात युनिफाइड स्टेट क्वालिफिकेशन एक्झाम देण्याची परवानगी युक्रेन देईल, असे युक्रेनच्या उप-परराष्ट्रमंत्र्यांनी नमूद केल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) बुधवारी सांगितले. झापरोवा यांच्या भारत दौऱ्याच्या समारोपाच्या वेळी परराष्ट्र मंत्रालयाकडून एक निवेदन जारी करून ही माहिती देण्यात आली.

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रशियाने आक्रमण सुरू केले तेव्हा, सुमारे 19 हजार भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये शिकत होते. अंदाजानुसार, सुमारे 2 हजार भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये परत गेले आहेत आणि ते बहुधा पूर्व युरोपीय देशाच्या पश्चिम भागात राहत आहेत. युक्रेनियन अधिकार्‍यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे, जे विद्यार्थी अजूनही भारतात आहेत ते ऑनलाइन वर्गात सहभागी होऊ शकतात आणि त्यांना भारतातच युनिफाइड स्टेट क्वालिफिकेशन एक्झामसाठी (USQE) बसण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

- Advertisement -

परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांचीही घेतली भेट
भारतदौऱ्यादरम्यान युक्रेनच्या उप-परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी प्रथम परराष्ट्र मंत्रालयातील सचिव (पश्चिम) संजय वर्मा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली आणि नंतर परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांची भेट घेतली. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, झापरोव्हा यांनी आपल्या भेटीदरम्यान भारतासोबत अधिक मजबूत आणि घनिष्ठ संबंध निर्माण करण्याची युक्रेनची इच्छा व्यक्त केली. झापरोवा यांच्या भारत भेटीमुळे दोन्ही देशांमधील सहकार्याला चालना मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -