घरदेश-विदेशसुदानमधील भारतीयांच्या परिस्थितीचा पंतप्रधानांनी घेतला आढावा; सतर्क राहण्याचे आवाहन

सुदानमधील भारतीयांच्या परिस्थितीचा पंतप्रधानांनी घेतला आढावा; सतर्क राहण्याचे आवाहन

Subscribe

नवी दिल्ली : सुदानची राजधानी खार्तूम आणि देशाच्या इतर भागात हिंसाचारात एका भारतीयासह 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हिंसाचारग्रस्त सुदानमधील भारतीयांशी संबंधित परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सुदानमधील परिस्थितीबाबत सतर्क राहण्याचे आणि भारतीयांना शक्य तेवढी मदत प्रदान करण्याचे आवाहन केले आहे. (More than 300 people, including an Indian, have died in violence in Sudan’s capital Khartoum and other parts of the country)

पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) जारी केलेल्या निवेदनानुसार सुदानमध्ये वेगाने बदलणारी सुरक्षा परिस्थिती आणि विविध पर्यायांची व्यवहार्यता लक्षात घेऊन आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित निर्वासन योजना तयार करण्याचे निर्देश मोदींनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. याशिवाय सुदानमध्ये सध्या वास्तव्यास असलेल्या 3,000 हून अधिक भारतीय नागरिकांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या बैठकीला परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, सुदानमधील भारताचे राजदूत, वायुसेना आणि नौदलाचे प्रमुख, परराष्ट्र व्यवहार आणि संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ मुत्सद्दी याशिवाय डिजिटल स्वरूपात उपस्थित होते.

- Advertisement -

पंतप्रधान कार्यालयाने म्हटले की, “पंतप्रधान मोदींनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सुदानमधील परिस्थितीबाबत सतर्क राहण्याचे, घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आणि भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचे सतत मूल्यांकन करून त्यांना शक्य ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय सुदानमधील झपाट्याने बदलणारी सुरक्षा परिस्थिती आणि विविध पर्यायांची व्यवहार्यता लक्षात घेऊन आकस्मिक निर्वासन योजना तयार करण्याचे निर्देशही पंतप्रधानांनी दिले आहेत.” यावेळी त्यांनी सुदान तसेच भारताची मोठी उपस्थिती इतर शेजारी देशांशी घनिष्ठ संबंध राखण्यावरही भर दिला आहे.

भारताने गुरुवारी सांगितले की, सुदानमधील परिस्थिती “अत्यंत तणावपूर्ण” आहे आणि भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी अमेरिका, ब्रिटन, सौदी अरेबिया आणि इजिप्तसह विविध देशांशी जवळून समन्वय साधण्याचा प्रयत्न करत आहे.

- Advertisement -

सुदानमधील संघर्ष थांबण्याची चिन्हे नाहीत
सुदानची राजधानी खार्तूम आणि देशाच्या इतर भागात हिंसाचारात 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, यात एका भारतीय नागरिकाचाही समावेश आहे. हा संघर्ष देशाच्या लष्करी नेतृत्वातील सत्ता संघर्षाचा थेट परिणाम आहे. सुदानचे नियमित सैन्य आणि देशातील ‘रॅपिड सपोर्ट फोर्स’ (RSF) या निमलष्करी दलाच्या संघर्षामुळे हा हिंसाचार घडला आहे. सलग सातव्या दिवशी संघर्ष सुरू असून हा संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -