घरदेश-विदेशराजीव गांधींनी एअरपोर्टवरच निर्णय घेतला...; अमित शाह यांनी सांगितला किस्सा

राजीव गांधींनी एअरपोर्टवरच निर्णय घेतला…; अमित शाह यांनी सांगितला किस्सा

Subscribe

नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये भाजपाचे पूर्ण बहुमताने सरकार येईल असा विश्वास केंद्रीय गृह मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्यावर आरोप केला आहे. राजीव गांधी यांच्यासारखा शब्द फिरवणार नाही असे सांगत त्यांनी ३० वर्षांपूर्वीचा एक किस्सा सांगितला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी गेल्यानंतर कर्नाटकमध्ये पोटनिवडणुका लागल्या आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळणार असून आमचे सरकार येईल असा विश्वास अमित शाहा यांनी एका वृत्तसंस्थेच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. यावेळी त्यांनी राज्य सरकारला तुमच्या सरकारच्या कार्यकाळात तुम्ही किती पैसे दिलेत? ते सांगा आणि एकदा आमच्या कार्यकाळात राज्यांना आम्ही किती पैसे देत आहोत ते पाहण्याचे आव्हान अमित शाहा यांनी काँग्रेस नेत्यांना दिले. एवढेच नाही तर त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर शब्द फिरवल्याचा आरोप केला आहे.

- Advertisement -

अमित शाह यांनी ३० वर्षांपूर्वीचा किस्सा सांगिताना म्हणाले की, राजीव गांधी यांनी एअरपोर्टवरच निर्णय घेत वीरेंद्र पाटील उद्यापासून मुख्यमंत्री नसतील असा निर्णय घेतला होता, पण आम्ही अस करणार नाही. जगदीश शेट्टार काँग्रेसमध्ये गेल्याने त्यांना वाटत असेल ते जिंकतील तर त्यांना हे मान्य करायला हवे की, ते स्वबळावर जिंकू शकत नाहीत. कारण कर्नाटकमधून आमची व्होट बँक कुठेही गेलेली नाही, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी जगदीश शेट्टार यांच्यावर टीका करताना म्हणाले की, भाजपा एकसंध आणि एकजूट असलेला पक्ष आहे. त्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, आम्ही कर्नाटकात पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करणार आहोत. ते म्हणाले की, जेव्हा पक्ष कठोर निर्णय घेत असतो तेव्हा काही नेत्यांना निर्णय मान्य नसतात आणि ते पक्ष सोडण्याचा निर्णय घेतात, असे वक्तव्य अमित शाह यांनी जगदीश शेट्टार यांना उद्देशून केले.

- Advertisement -

कठोर धोरणांमुळे कर्नाटक सुरक्षित
अमित शाह यांनी कार्यक्रमात पीएफआयच्या मुद्द्यावरही भाष्य केले. पीएफआयमुळे कर्नाटकमध्ये लोकांच्या हत्या होत होत्या. भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत. पण आम्ही कठोर धोरणाचा अवलंब केल्यानंतर आता कर्नाटकमध्ये सुरक्षित वातावरण निर्माण झाले असल्याचा विश्वास अमित शाह व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -