घरताज्या घडामोडीसलमानच्या सिनेमाचा फंडा : 'किसी का तिकीट, किसी का सफर', रेल्वेची प्रवाशांसाठी...

सलमानच्या सिनेमाचा फंडा : ‘किसी का तिकीट, किसी का सफर’, रेल्वेची प्रवाशांसाठी सुविधा

Subscribe

रेल्वेने प्रवास करणाऱ्यासाठी संबंधीत प्रवाशाकडे रेल्वेचे तिकीट असणे बंधनकारक आहे. मात्र तिकीट नसल्याने अनेकांची टीसींकडून धरपकड केली जाते. परिणामी दंडात्मक कारवाईचा प्रवाशांना सामना करावा लागतो. परंतु, प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.

रेल्वेने प्रवास करणाऱ्यासाठी संबंधीत प्रवाशाकडे रेल्वेचे तिकीट असणे बंधनकारक आहे. मात्र तिकीट नसल्याने अनेकांची टीसींकडून धरपकड केली जाते. परिणामी दंडात्मक कारवाईचा प्रवाशांना सामना करावा लागतो. परंतु, प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कारण आता आपल्याकडे तिकीट नसल्याने आपल्याला दुसऱ्याच्या तिकीटावर प्रवास करता येणार आहे. (biz indian railway kisi ka ticket kisi ka safar railway ticket transfer rule salman khan kisi ka bhai kisi ki jaan)

नेमकी काय आहे रेल्वेची संकल्पना?

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा शुक्रवारी ‘किसी का भाई, किसी की जान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. याच चित्रपटाच्या नावाचा वापर करत पश्चिम रेल्वेने प्रवाशांसाठी एक संकल्पना सुरू केली आहे. त्यानुसार, ‘किसी का भाई, किसी की जान’ हे सलमान खानच्या चित्रपटाचे नाव असून पश्चिम रेल्वेने या चित्रपटाच्या शीर्षकाच्या धर्तीवर ‘किसी का तिकीट, किसी का सफर’ या घोषवाक्याद्वारे रेल्वेने प्रवाशांसाठी नवीन संकल्पना सुरू केली आहे.

संकल्पनेचा वापर कसा कराल?

- Advertisement -

तुम्हाला तुमचे तिकीट कुटुंबातील सदस्याच्या नावावर ट्रान्सफर करायचे असेल, तर सर्वप्रथम तुमचे तिकीट कन्फर्म होणे आवश्यक आहे. वेटिंग लिस्ट किंवा आरएसी तिकीट, ऑनलाइन किंवा ऑफलाइन बुक केलेले असले तरीही ट्रान्सफर करू शकत नाही. कुटुंबातील सदस्यांमध्येही, तुम्ही फक्त तुमचे पालक, भाऊ किंवा बहीण, जोडीदार आणि मुलगा किंवा मुलगी यांना तिकीट हस्तांतरित करू शकता आणि इतर कोणत्याही नातेवाईकाला नाही. ट्रेन सुटण्याच्या 24 तासांपूर्वी प्रवाशांना तिकीटाची विनंती करणे आवश्यक आहे.

तिकीट कसे हस्तांतरित करावे?

  • तुम्हाला तुमच्या कन्फर्म तिकिटाची प्रिंटआउट घ्यावी लागेल आणि आरक्षण काउंटरवर जावे लागेल.
  • ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्हाला तिकीट हस्तांतरित करायचे आहे, त्या व्यक्तीचे आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्रासह तुम्हाला अर्ज सादर करावा लागेल.
  • कन्फर्म तिकीट धारण करणारी व्यक्ती आणि ज्या व्यक्तीच्या नावावर तिकीट हस्तांतरित केले जाणार आहे, त्या दोघांनाही त्यांच्या नातेसंबंधाचा पुरावा द्यावा लागेल.
  • दोन्ही प्रवाशांचे ओळखपत्र आणि तिकीटाची प्रत जवळच्या तिकीट काउंटरवर मुख्य आरक्षण पर्यवेक्षकाकडे जमा करावी लागेल.

हेही वाचा – खारघर दुर्घटना : सरकारची भूमिका स्पष्ट नसल्याने न्यायासाठी राज्यपालांची भेट घेतली – दानवे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -