घरताज्या घडामोडीआज देशात तुष्टीकरणावर नाही तर, संतुष्टीकरणावर भर दिला जातोय - पंतप्रधान नरेंद्र...

आज देशात तुष्टीकरणावर नाही तर, संतुष्टीकरणावर भर दिला जातोय – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Subscribe

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दादरा आणि नगर हवेलीची राजधानी सिल्वासा येथे भाषण केले. पंतप्रधान मोदींचे हे भाषण ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दादरा आणि नगर हवेलीची राजधानी सिल्वासा येथे भाषण केले. पंतप्रधान मोदींचे हे भाषण ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते दमण आणि द्विप आणि दादर नगर हवेलीमध्ये अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. (national pm modi visit daman and diu pm inaugurated many projects)

सिल्वासा येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 4 हजार 873 कोटींच्या 96 प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिल्वासा येथील नमो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चला भेट दिली आणि संस्था राष्ट्राला समर्पित केली. ही संस्था 203 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आली आहे.

- Advertisement -

याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिल्वासा येथे आयोजित एका कार्यक्रमात शहरी, प्रधानमंत्री आवास योजनेच्या काही लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या. यावेळी “स्वातंत्र्य मिळून दशके उलटली, पण दमण, दीव, दादरा आणि नगर हवेलीत एकही वैद्यकीय महाविद्यालय बांधले गेले नाही. ज्यांनी अनेक दशके देशावर राज्य केले, त्यांनी तरुणांवर झालेला अन्याय लक्षात घ्यायला हवा. या छोट्या केंद्रशासित प्रदेशाचा येथे विकास करून काही मिळणार नाही, हे त्यांना समजले”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.

“गेल्या 9 वर्षांत आम्ही देशात नवीन कार्यशैली विकसित केली आहे. आता ज्या कामाचा पाया रचला आहे, ते काम वेगाने पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आपण एक काम पूर्ण करताच दुसरे काम सुरू करतो. आज देशात तुष्टीकरणावर नाही, तर संतुष्टीकरणावर भर दिला जात आहे. जेव्हा सरकार स्वतः लोकांच्या दारात जाते तेव्हा भेदभाव संपतो, भ्रष्टाचार संपतो, घराणेशाही संपते”, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – साक्षात ‘क्रिकेटचा देव’ भेटला अन् चिमुरडा चाहता झाला थक्क; सचिनची ‘ही’ अनोखी भेट होतेय व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -