घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्ररिफायनरी प्रकल्पासाठी उध्दव ठाकरेंनीच दिले पंतप्रधानांना पत्र; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा खुलासा

रिफायनरी प्रकल्पासाठी उध्दव ठाकरेंनीच दिले पंतप्रधानांना पत्र; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा खुलासा

Subscribe

नाशिक : राज्यातील प्रकल्प बाहेर गेले की, पत्रकार परिषदा घेऊन विरोध करायचा, गददार म्हणायचे आणि आता राज्यात प्रकल्प येत असतांना विरोध करायचा ही दुटप्पी भुमिका कशासाठी ? असा सवाल करत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर घणाघात केला. विशेष म्हणजे ज्या लोकांचा बारसू रिफायनरीला विरोध आहेत त्यांनीच मुख्यमंत्री असतांना पंतप्रधान मोदींनापत्र देत ही जागा सूचवली होती असा खुलासाही सामंत यांनी केला.

मंत्री उदय सामंत यांनी नाशिक दौर्‍यावर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, सद्यस्थितीत बारसू रिफायनरीबाबत सगळे गैरसमज पसरवले जात आहेत. सकाळपासून सगळी परिस्थिती बघत असून प्रसार माध्यमांबाबत आम्हाला आदर आहे. फक्त एका व्यक्तीबाबत हा प्रश्न आला आहे, ते उलट सुलट प्रश्न विचारत असल्याने झाले असावे, बारसू रिफायनरी हा क्रांतिकारी प्रकल्प असून यामुळे लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे. काही लोकांचे मनसुबे धुळीस मिळाल्यामुळे जालियनवाला बाग होईल, असे म्हटले जात आहे.

- Advertisement -

उदय सामंत म्हणाले की, नाणार रद्द करण्यात आम्ही देखील होतो. बारसूमध्ये रिफायनरी व्हावी, हे पत्र उद्धव ठाकरे यांनी १२ जानेवारी २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले होते. एकीकडे पत्र द्यायचे आणि दुसरीकडे विरोध करायचा हा दुटप्पीपणा आहे. आंदोलन करुनच मी देखील इथपर्यंत पोहोचलो आहे. स्थानिकांचा नाही, मात्र काही लोकांचा विरोध आहे. काल देखील याबाबत बैठक झाली. ज्याला मला भेटायचे आहे, त्यांना मी भेटेन. उद्योगमंत्र्यांना जाळून टाकू असे जे म्हणत आहेत, त्यांना तुम्ही काय म्हणाल? असा सवालही सामंत यांनी उपस्थित केला आहे. जसे संघर्षवाले आहेत, तसेच समर्थक देखील आहेत. चुकत असेल तर आम्हाला सूचित करा, विरोधकांना कळले की आंदोलन होत नाही, म्हणून हे सुरु आहे. प्रसारमाध्यमांनी देखील काही ठिकाणी आम्हाला सहकार्य करणे महत्वाचे असल्याचे आवाहन यावेळी उदय सामंत यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -