घरक्रीडागीता फोगाटच्या ट्वीटला उर्मिला मातोंडकरने लाईक करत आंदोलनाला समर्थन

गीता फोगाटच्या ट्वीटला उर्मिला मातोंडकरने लाईक करत आंदोलनाला समर्थन

Subscribe

मुंबई | “न्यायासाठी लढणाऱ्या तुमच्या बहिणी आणि मुलीचा आवाज बनून पाठिंबा द्यावा”, असे भावनिक ट्वीट कुस्तीपटू गीता फोगाट (Wrestler Geeta Phogat) यांनी केले आहे. महिला कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांनी लैंगिक शोषणा केल्याचा (Sexual Abuse) आरोप आहे. यानंतर दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) बृजभूषण सिंह यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल केले आहेत. “आरोपी म्हणून मी राजीनामा देणार नाही. मी आरोपी नाही”, बृजभूषण सिंहानी गुन्हा दाखल झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, कुस्तीपटू गीता फोगाट यांनी बृजभूषण सिंह यांच्या विरोधात देशवासियांकडून पाठिंबा मिळावा म्हणून भावनिक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये गीता फोगाट यांनी #IStandWithMyChampions असा हॅशटॅग दिला आहे. गीता फोगाटच्या या ट्वीटला अभिनेत्री आणि ठाकरे गटाच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी कुटुस्तीपटूंना सपोर्ट करणारा व्हिडिओ देखील बनविला होता. यानंतर आज गीता फोगाट यांच्या ट्वीटला लाईक करत त्यांच्या मोहिमेला उर्मिला मातोंडकर पाठिंबा दिला आहे. गीता फोगाट ट्वीट म्हणाल्या, “मी तमाम देशवासियांना विनंती करते की, न्यायासाठी लढणाऱ्या तुमच्या बहिणी आणि मुलींचा आवाज बनून पाठिंबा द्यावा. कारण, हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे. काही लोक हे आंदोलन जात-धर्म आणि राजकारणाशी जोडून मुळ मुद्याकडे दुर्लक्ष करण्याचे काम करत आहेत. ही दुर्वैवी गोष्ट आहे.”

- Advertisement -

दिल्लीच्या जंतर-मंतर येथे कुस्तीपटूंचे आंदोलन सुरू आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कुस्तीपटूंची भेट घेतली आहे. यापूर्वी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वाड्रा यांनी देखील आंदोलक कुस्तीपटूंची भेट घेतली आहे. यापूर्वी ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा यांनी कुस्तीपटूंच्या आंदोलकांना पाठिंबा देणारे ट्वीट केले आहे. यासंदर्भात नीरज चोप्रांनी ट्वीट केले आहे की, “बृजभूषण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना लवकरात लवकर न्याय मिळावा. खेळाडूंना रस्त्यावर उतरून न्यायाची मागणी करताना पाहून मला खूप वेदना होत आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – “आरोपी म्हणून मी राजीनामा देणार नाही”, बृजभूषण सिंहांची पहिली प्रतिक्रिया

आरोपी म्हणून मी राजीनामा देणार नाही –  बृजभूषण सिंह     

“आरोपी म्हणून मी राजीनामा देणार नाही, मी आरोपी नाही”, अशी प्रतिक्रिया बृजभूषण सिंह यांनी माध्यमांना दिली आहे. यावेळी बृजभूषण सिंह म्हणाले, “माझा अध्यक्षपदाचा कार्यकाळ जवळपास संपला आहे. त्यामुळे जोपर्यंत दुसऱ्या अध्यक्षची निवड होत नाही, तोपर्यंत मी भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्ष पदावरून राजीनामा देणार नाही. यासाठी सरकारने समिती स्थापन केली आहे. तीन जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. राजीनामा देणे ही फार मोठी गोष्टी नाही. पण, आरोपी म्हणून मी राजीनामा देणार नाही. मी आरोपी नाही, या कुस्तीपटूंच्या मागण्या सातत्याने बदलत आहेत. पहिल्यांदा कुस्तीपटूंनी आंदोलन केल्यानंतर राजीनामा देण्याची मागणी केली होती. तेव्हा मी म्हटले होते की, राजीनामा देण्याएवढी मोठी गोष्ट नाही. परंतु, मी अध्यक्षपदाचा राजीनामा देणे म्हणजे कुस्तीपटूंनी केलेले सर्व आरोप मान्य केल्यासारखे होईल. कुस्तीपटू हे माझ्याविरोधात लोकांना भडकविण्याचे काम करत आहेत”, अशी टीका त्यांनी कुस्तीपटूंवर केली आहे.

हेही वाचा – अखेर बृजभूषण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल; पॉस्कोसह अन्य कलमे लावली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -