घरताज्या घडामोडीपवारांचा हा वैयक्तिक निर्णय, मला कल्पनाही नव्हती - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पवारांचा हा वैयक्तिक निर्णय, मला कल्पनाही नव्हती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज अध्यक्षपदावरून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. शरद पवारांच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेतेमंडळी आणि पदाधिकाऱ्यांनी पवारांना निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. मात्र, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या महाविकास आघाडीवर या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, शरद पवारांचा हा वैयक्तिक निर्णय असून मला काहीही कल्पना नव्हती, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, मला याबाबत काहीही कल्पना नाही. परंतु हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. यावेळी त्यावर काही बोलणं मला योग्य वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं आहे. यावर मला आता काहीही भाष्य करायचं नाहीये. मात्र, या संपूर्ण परिस्थितीवर आमचं लक्ष आहे. त्यामुळे योग्य वेळ आम्ही त्यावर भाष्य करू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

हे सगळं का होत आहे, कशासाठी होत आहे? आणि पुढे काय होणार आहे?, यावर जेव्हा निर्णय घेतला जाईल, तेव्हाच आम्ही यावर भाष्य करणार आहोत, असंही फडणवीस म्हणाले.

पहाटेच्या शपथविधीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवारांचं पुस्तक मी वाचलेलं नाही. पण मलाही एक पुस्तक लिहायचं आहे. हे पुस्तक मी योग्यवेळी लिहिणार आहे. त्यामुळे नेमकं त्यांनी काय म्हटलंय?, मला काय सत्य सांगायचं आहे?, त्यावर मी पुस्तक लिहिन तेव्हा मी तुम्हाला नक्कीच सांगेन, असंही फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

शरद पवारांना फेरविचार करायला सांगावे – अशोक चव्हाण

शरद पवार यांच्या निवृत्तीच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीवर काही परिणाम होणार नाही. नेतृत्व हे बदलत राहतं. पण अनुभवी नेता या प्रक्रियेतून बाहेर पडला तर नुकसान होईल. त्यामुळे त्यांचे राहणे गरजेचे आहे, असे मला वाटतं. पण हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचा असून, याबाबत समिती नेमण्यात आली आहे त्या समितीला पुढील निर्णय घ्यावा लागणार आहे. या समितीने सध्याच्या संपूर्ण गोष्टीचा विचार करून शरद पवारांना फेरविचार करायला सांगावे अशी आमची विनंती आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले.


हेही वाचा : शरद पवारांच्या निवृत्तीने ‘मविआ’वर काय परिणाम होणार? अशोक चव्हाण म्हणाले…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -