घरक्राइमonline fraud : बारावी पास पण कमाई 5 कोटी; मुंबई पोलिसांकडून तरुणाला...

online fraud : बारावी पास पण कमाई 5 कोटी; मुंबई पोलिसांकडून तरुणाला अटक

Subscribe

मुंबई : व्यावसाय करून दिवसाला 5 कोटी रुपये कमवल्याचे आपल्या वाचनात किंवा ऐकण्यात आले आहे, पण गैरप्रकार करून 5 कोटी रुपये आणि तेही दिवसाला, असा अजब प्रकार समोर आला आहे. बारावी पास असलेला एक तरुण गैरप्रकारातून दिवसाला 5 कोटींची कमाई करत असल्याचे समोर आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) तरुणाला हैदराबाद येथून अटक केली असून या तरुणाचे काम पाहून पोलिसही चक्रावले आहेत. या तरुणाच्या अटकेमुळे साईबर क्राईमचे अनेक गुन्हे उघडकीस येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

श्रीनिवास राव दादी (49) (Srinivasa Rao Dadi) असे आरोपी तरुणाचे नाव असून तो मुळचा हैदराबादचा रहिवासी आहे. मुंबईतील बांगूर नगर पोलिसांच्या पथकाने सायबर गुन्ह्याखाली श्रीनिवासला हैदराबादमधील एका आलिशान हॉटेलमधून अटक केली असून त्याच्यासह टोळीतील आणखी चार सदस्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या तेलंगणातील सायबराबाद येथील घरातून पोलिसांनी मोबाईल, लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि 1.5 कोटी रुपये जप्त केले आहेत. तपासादरम्यान हजारो महिलांची छायाचित्रे, त्यांचे ईमेल आयडी, त्यांच्याशी चॅटिंगचे स्क्रीन शॉट्स आणि लांबलचक संभाषणांचे तपशील पोलिसांच्या हाती लागले आहेत. यासह पोलिसांनी आरोपीची तब्बल 40 बँक खाती गोठवली आहेत.

- Advertisement -

असा घालायचे गंडा
श्रीनिवास आणि त्याचे साथीदार लोकांना विशेषत: महिलांना फोन करायचे आणि पोलीस असल्याचे भासवून गंडा घालायचे. ते लोकांना लोकांना तुमच्या नावाने पाठवलेल्या कुरिअरमध्ये अधिकाऱ्यांना शस्त्रे किंवा ड्रग्स मिळाले आहेत सांगून आपल्या जाळ्यात ओढायचे. यानंतर सेटेलमेंटसाठी त्यांच्याकडे पैशांची मागणी करताना त्यांचे बँक डिटेल्स घ्यायचे आणि त्यांना गंडा घालायचे.

दररोज 5 ते 10 कोटी रुपयांचे व्यवहार
श्रीनिवासच्या खात्यातून दररोज 5 ते 10 कोटी रुपयांचे व्यवहार होत असल्याचे समोर आले आहे. या व्यावहारातील रक्कम क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून बदलून एका चिनी नागरिकाकडे पोहचवली जात होती. या टोळीचे मुंबई, कोलकाता, आंध्र प्रदेश, तेलंगणा आदी राज्यांतही नेटवर्क असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -