घरमहाराष्ट्रशरद पवारच अध्यक्ष राहावे, असा ठराव मांडणार - छगन भुजबळ

शरद पवारच अध्यक्ष राहावे, असा ठराव मांडणार – छगन भुजबळ

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar resigned) यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. पण आज याबाबत निर्णय घेण्यासाठी 11 वाजता मुंबईतील महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुख्य कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar resigned) यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. पवारांच्या या घोषणेनंतर पक्षातील कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास सुरुवात केली. तर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या बाहेर गेल्या तीन दिवसांपासून कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. पण आज याबाबत निर्णय घेण्यासाठी 11 वाजता मुंबईतील महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुख्य कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीला पक्षाच्या अध्यक्ष निवड समितीच्या नेत्यांसह सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. पण यापुढे देखील शरद पवारच अध्यक्ष राहावे यासाठी ठराव मांडण्यात येणार आहे, अशी माहिती पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे.

हेही वाचा – Sharad Pawar Resigns राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष निवडीसाठी ५ मे रोजी बैठक, शरद पवार म्हणाले..

- Advertisement -

आमच्या कमिटीच्या लोकांनी काही वेगवेगळे पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु देशातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, महाराष्ट्राचे नेते या सगळ्यांनी पवार साहेबचं अध्यक्ष पदी असले पाहिजेत, अशा प्रकारचा आग्रह धरलेला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीमध्ये सुद्धा पवारसाहेबांनीच अध्यक्ष राहावे, असा ठराव मांडण्यात येणार आहे, अशी माहिती छगन भुजबळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
आज होणाऱ्या बैठकीसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर एकच गर्दी केली आहे. एकीकडे कार्यालयाच्याबाहेर कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे भजन-कीर्तन करण्यात येत आहे. शरद पवार यांनी घेतलेला निर्णय त्वरीत मागे घ्यावा. तसेच याबाबत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी वारकरी संप्रदायातील कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली आहे. 

- Advertisement -

विरोधी पक्षातील नेत्यांचा शरद पवारांना फोन
काल गुरुवारी (ता. 04 मे) काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांनी सुप्रिया सुळे यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता. तर आज जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला, माकपचे नेते सीताराम येचुरी, आपचे नेते संजय सिंग आणि सीपीआयचे नेते डी. राजा यांनी फोन करून संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -