घरमहाराष्ट्रSharad Pawar Resigns राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष निवडीसाठी ५ मे रोजी बैठक, शरद...

Sharad Pawar Resigns राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष निवडीसाठी ५ मे रोजी बैठक, शरद पवार म्हणाले..

Subscribe

ही बैठक ६ मे रोजी होणार होती. ती ५ मेला घ्यावी असे शरद पवार यांनी सुचवले आहे. निवड समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल असेही पवारांनी म्हटले आहे.

NCP President मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदाबाबत निर्णय घेण्यासाठी ५ मे रोजी निवड समितीची पहिली बैठक होणार आहे. शरद पवार यांनी यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष राहाणार नसल्याचे २ मे रोजी जाहीर केले. त्यासोबत त्यांनी एक निवड समिती देखील सुचवली आहे. या निवड समितीची पहिली बैठक ५ मे रोजी होणार आहे.

दरम्यान, ही बैठक ६ मे रोजी होणार होती. ती ५ मेला घ्यावी असे शरद पवार यांनी सुचवले आहे. निवड समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल असेही पवारांनी म्हटले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचे गुढ आणखी वाढले आहे.

- Advertisement -

शरद पवार यांनी काल पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष असणार नाही, असा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या निर्णयाला जोरदार विरोध केला. राजकीय वर्तुळातही या निर्णयाने खळबळ उडाली. अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय मागे घ्यावा यासाठी कार्यकर्ते हट्टाला पेटले तेव्हा पवारांनी मी दोन-तीन दिवसांत निर्णयाचा फेरविचार करेन असे जाहीर केले.
त्यानंतर आज (बुधवार) त्यांनी यासंबंधी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यापूर्वी वरिष्ठ नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे होते, असे शरद पवार म्हणाले आहेत. पवारांनी त्यांच्या कालच्या भाषणादरम्यानच अध्यक्षपदासाठी एक समिती नेमण्याची सूचना केली. त्या समितीची ५ मे रोजी बैठक घ्यावी, त्या बैठकीत जो काही निर्णय होईल तो मला मान्य असेल, असंही शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतरची पवारांची ही पहिली प्रतिक्रिया आहे.

- Advertisement -

हेही वाचा : राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा आता कोणाकडे, ताई की दादा?

पक्षातील वरिष्ठांना सांगितलं असतं तर…
शरद पवार यांचा लोकशाहीवर विश्वास आहे, त्यांनी लोकांचा, राष्ट्रवादीतील नेते, आमदार, खासदार यांचे मत जाणून घेतले पाहिजे होते, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. त्यावरही पवारांनी आज भाष्य केले आहे. ते म्हणाले, पक्षातील वरिष्ठांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले पाहिजे होतं असं मला वाटतं आहे. जर मी हा निर्णय सर्वांना विचारात घेऊन घेतला असता तर स्वाभाविकपणे सर्वांनी मला विरोध केला असता. म्हणून मी हा निर्णय माझ्या मनाशी एकमत करुन घेतला.

हेही वाचा : शरद पवारांनी आम्हाला विश्वासात का घेतलं नाही? जितेंद्र आव्हाडांचा प्रश्न

अध्यक्षपदाचा निर्णय ५ मेला
अध्यक्ष निवड समितीची बैठक ही ६ मे रोजी घेण्याचे ठरले होते, ती बैठक ५ मेलाच घेण्याचे पवारांनी सांगितले आहे. त्यानुसार आता ५ मे रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत जो काही निर्णय होईल तो मला मान्य असेल, असेही पवारांनी म्हटले आहे. त्यामुळे या बैठकीत जर शरद पवार यांनाच पुन्हा अध्यक्षपदी कायम राहाण्याचा निर्मय समितीने घेतला तर तो पवार मान्य करणार का? की राष्ट्रवादी काँग्रेसला नवीन अध्यक्ष मिळणार, हे आता ५ मेला ठरणार आहे.

हेही वाचा : देशात ताई, राज्यात दादा..? छगन भुजबळांनी केले सूचक वक्तव्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -