घरदेश-विदेशModi-Shah : 'असत्यमेव जयते' हे ज्यांचे आदर्श... काँग्रेसची मोदी-शाहांवर जोरदार टीका

Modi-Shah : ‘असत्यमेव जयते’ हे ज्यांचे आदर्श… काँग्रेसची मोदी-शाहांवर जोरदार टीका

Subscribe

नवी दिल्ली : सर्व भाषांच्या संवर्धन करण्याची भाजपाची (BJP) भूमिका आहे, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांनी केले आहे. त्यावरून काँग्रेसने शुक्रवारी जोरदार टीका केली. मोदी सरकारने संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी 600 कोटी रुपयांहून अधिक खर्च केले, तर कन्नडसाठी केवळ 3 कोटी रुपये खर्च केले, अशी आकडेवारीच काँग्रेसने (Congress) सादर केली. ‘असत्यमेव जयते’ हे ज्यांचे आदर्श वाक्य आहे, अशा व्यक्तीसमवेत तुम्ही काम करत आहात, अशी टीकाही काँग्रेसने केली आहे.

अमित शाह यांनी अलीकडेच एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी, दक्षिणेकडील राज्यांत हिंदी लादण्याचा प्रयत्न भाजपा आणि केंद्र सरकार करत असल्याचा आरोप फेटाळून लावला. नरेंद्र मोदी सरकारने राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये, सर्व भाषांमध्ये विविध भरती परीक्षा घेण्याची व्यवस्था केली होती. भारतीय भाषांच्या संवर्धनाचा वसा भाजपाने घेतला असल्याचे अमित शाह यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

काँग्रेसचे संपर्क प्रभारी सरचिटणीस जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी ट्वीट करून अमित शाह यांचा हा दावा खोडून काढला आहे. सर्व भाषांना भाजपा प्रोत्साहन देत असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. पण प्रत्यक्षात आकडे काही वेगळेच दर्शवतात. मोदी सरकारने संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी 640 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्याचवेळी देशातील सहा अभिजात भाषांपैकी एक असलेल्या कन्नडला प्रोत्साहन देण्यासाठी केवळ 3 कोटी रुपये देण्यात आले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

- Advertisement -

जयराम रमेश यांनी भाजपावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. भारतीय भाषांच्या संवर्धनाचा वसा भाजपाने घेतला आहे म्हणूनच महान कुवेम्पूचा (ज्याने राज्यगीत लिहिले) अपमान करणाऱ्या व्यक्तिला कर्नाटकातील पाठ्यपुस्तक पुनर्निरीक्षण समितीचे अध्यक्ष करण्यात आले होते का? म्हणूनच वनसंवर्धन (सुधारणा) विधेयक, 2022बरोबरच कायद्यांची इंग्रजी नावे काढून टाकून त्याजागी हिंदी नावे ठेवण्याची प्रथा सुरू झाली आहे का? असे सवाल त्यांनी विचारले आहेत. मी अजून खूप गोष्टी सांगू शकतो. पण तुम्ही अशा व्यक्तीबरोबर काम करता, जिचे आदर्श वाक्य ‘असत्यमेव जयते’ आहे, अशी टीकाही रमेश यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -