घरदेश-विदेशमोदींची 'मन की बात' न ऐकणं विद्यार्थ्यांना पडलं महागात; शाळेने ठोठावला 100...

मोदींची ‘मन की बात’ न ऐकणं विद्यार्थ्यांना पडलं महागात; शाळेने ठोठावला 100 रुपयांचा दंड

Subscribe

'मन की बात' कार्यक्रमासाठी शाळेत न पोहोचणाऱ्या किंवा वैद्यकीय प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या मुलांना 100 रुपयांचा दंड ठोठावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या मासिक कार्यक्रमाचा 100 वा भाग गेल्या रविवारी पार पडला. 100 वा भाग असल्याने देशभरातील शाळांसह अनेक खास ठिकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रविवारीही मुलांना शाळेत बोलावण्यात आले होते. आता बातम्या येत आहेत की रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकण्यासाठी न आलेल्या मुलांकडून 100-100 रुपये दंड वसूल केला जात आहे. ( PM Narendra Modi Man ki baat school fined students for not listning to PM Narendra Modi radio pragramme man ki bat )

‘मन की बात’ कार्यक्रमासाठी शाळेत न पोहोचणाऱ्या किंवा वैद्यकीय प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या मुलांना 100 रुपयांचा दंड ठोठावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शाळा व्यवस्थापनामार्फत शाळेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर याबाबत आदेश जारी करण्यात आला आहे. ही घटना डेहराडूनच्या जीआरडी निरंजनपूर अकादमीमध्ये घडली आहे. नॅशनल असोसिएशन फॉर पॅरेंट्स अँड स्टुडंट्स राइट्सचे राष्ट्रीय अध्यक्ष आरिफ खान यांनी मुख्य शिक्षणाधिकारी, डेहराडून यांना पत्र लिहून याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.

- Advertisement -

शिक्षण विभागाने शाळेला नोटीस बजावून तीन दिवसांत उत्तर मागितले आहे. आरिफ खान म्हणाले की जीआरडी अकादमीने रविवारी मन की बात कार्यक्रमासाठी शाळेत न पोहोचलेल्या मुलांना १०० रुपये दंड किंवा वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश जारी केले आहेत. शाळा व्यवस्थापनाने शाळेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

( हेही वाचा: दिलासादायक! देशात खाद्यतेलाच्या किंमतीत घसरण; असे आहेत नवे दर )

- Advertisement -

पालकांनी त्यांना या मेसेजचा स्क्रीनशॉटही दाखवला आहे. मुख्य शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार यांनी सांगितले की, तक्रारीची दखल घेत अकादमीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तीन दिवसांत शाळेने आपली बाजू मांडली नाही तर शिक्षण विभाग कारवाई करेल. तक्रारदार संघटनेकडूनही पुरावे मागविण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात कार्यक्रमांतर्गत देशवासियांना संबोधित करत असतात. 30 एप्रिल 2023 ला मोदींचा मन की बात कार्यक्रमाचा 100 वा कार्यक्रम होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -