घरदेश-विदेश'हर्षद मेहता' इन्स्टाग्रामवर नको; हायकोर्टाचे आदेश

‘हर्षद मेहता’ इन्स्टाग्रामवर नको; हायकोर्टाचे आदेश

Subscribe

 

मुंबईः ‘स्कॅम १९९२ : द हर्षद मेहता स्टोरी’ या वेबसिरीजच्या व्हिडीओ क्लिप्स इन्स्टाग्रामवर दाखवू नका, असे आदेश उच्च न्यायालयाने ३२ इन्स्टाग्राम अकांऊटसना दिले आहेत.

- Advertisement -

याप्रकरणी या वेबसिरीजचे निर्माते अपलौज एटंरटेनमेंटने न्यायालयात याचिका केली होती. इन्स्टाग्रामवर दाखवण्यात येणाऱ्या या क्लिप्समुळे संबंधित संकेतस्थळ व अन्य खातेधारकांना गैरप्रकारे आर्थिक लाभ मिळत आहे. त्यामुळे वेबसिरीजच्या क्लिप्स इन्स्टाग्रामवर दाखवण्यास मनाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.

न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. याचिकेची दखल घेत न्यायालयाने हे आदेश दिले. या आदेशामुळे परवानगी नसलेल्या सर्वच संकेतस्थळांना या वेबसिरीजच्या क्लिप्स दाखवता येणार नाहीत. वेबसिरीजच्या क्लिप्स निर्मात्यांची परवानगी न घेताच प्रसारीत केल्या जात होत्या. याची मेटाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यावर काहीच कारवाई झाली नाही. अखेर यासाठी उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली.

- Advertisement -

कोरोनाकाळात या वेबसिरीजने ओटीटीवर धमाल उडवून दिली होती. या वेबसिरीजने जगभरातील यादिमधील टॉप टोन हाइयेस्टरेटेड टिव्ही शो मध्ये जागा बनवली होती. अभिनेता प्रतिक गांधी (pratik gandhi)तसेच दिग्दर्शक हंसल मेहता(hansal mehta) यांच्या या वेबसिरीजचा 250 कर्यक्रमांच्या यादित सगळ्यात जास्त प्रमाणात रेटिंग मिळणाऱ्या मालिंकामध्ये याचा समावेश झाला होता.’स्कॅम 1992 द हर्षद मेहता स्टोरी’ (scam 1992)या सिरिजला आईएमबीडीवर 10 पॉईंट रेटिंगपैकी 9.6 इतकी रेटिंग मिळाली होतं. इतकेच नाहि तर या वेब सिरिजने जगभरात 9 व्या स्थानावर बाजी मारली होती.

आईएमबीडीवर देण्यात येणारी रेटिंग ही लोकांनी दिलेल्या रेंटिगवर आधारीत असते. तसेच 1 ते 10 अंकापर्यंतच याला पॉईंट देण्यात येतात. या लिस्टमध्ये टॉपवर ‘बँड ऑफ ब्रदर्स’, ‘ब्रेकिंग बैड’, ‘चेर्नोबिल’ यांचा समावेश करण्यात आला होता. अभिनेता प्रतिक गांधी याला सिरिजमध्ये काम कण्यासाठी प्रचंड शारिरिक मेहनत घ्यावी लागली होती. त्याने तब्बल 18 किलो वजन वाढवले होते. या वेब सिरिजची कथा शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवणाऱ्या हर्षद मेहता याने केलेला घोटाळा यात मांडण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -