घरमहाराष्ट्रन्यायालयाने आम्हाला घटनात्मक ठरवलं; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य

न्यायालयाने आम्हाला घटनात्मक ठरवलं; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य

Subscribe

सर्वोच्च न्यायालयाने आमचं सरकार घटनात्मक ठरवल्याचं म्हटलं आहे. तसंच कोर्टाने दिलेल्या निर्णयावर  आम्ही समाधानी आहोत. मविआच्या मनसुब्यावर सर्वोच्च न्यायालयाने पाणी फेरल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे

सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षावर निर्णय दिल्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत, सर्वोच्च न्यायालयाने आमचं सरकार घटनात्मक ठरवल्याचं म्हटलं आहे. तसंच कोर्टाने दिलेल्या निर्णयावर  आम्ही समाधानी आहोत. मविआच्या मनसुब्यावर सर्वोच्च न्यायालयाने पाणी फेरल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.(  Supreme Court found us constitutional Statement by Deputy Chief Minister Devendra Fadnavis )

उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवता येणार नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे. तसंच आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार हा अध्यक्षांना असतो, असंही न्यायालयाने स्पष्ट केल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले.

- Advertisement -

न्यायालयानं असंही म्हटलं की , त्यावेळी अशा काही मोठ्या घटना घडल्या नाहीत, की त्यामुळे अपात्रतेचा निर्णयात आम्ही हस्तक्षेप करायला हवा. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आला आहे, असं फडणवीस म्हणाले.

अपात्रतेची कारवाई ज्या आमदारांवर आहे त्या आमदारांकडे सर्व अधिकार असल्याचंही महत्त्वाचं विधानही सर्वोच्च न्यायालयाने केलं आहे. तसंच निवडणूक आयोगाकडे सर्व अधिकार असल्याचंही न्यायालयाने म्हटल्याचं, फडणवीस म्हणाले. त्यामुळे ज्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, त्यामुळे त्यांनी केलेले आरोप हे चुकीचे होते हे आता सिद्ध झालं आहे. तसंच, कोणत्या पक्षाला चिन्ह, पक्षाचं नावं द्यावं हा संपूर्ण अधिकार हा निवडणूक आयोगाला असल्याचं, सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे हे स्पष्ट झालं आहे की, निवडणूक आयोगाला संपूर्ण अधिकार आहेत, असं न्यायालयाने स्पष्ट केल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

( हेही वाचा: “आजचा निकाल हा विरोधकांना चपराक देणारा…”; एकनाथ शिंदेंची टीका )

सर्वोच्च न्यायालयाने विरोधकांची शंका दूर केली

तसचं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापनेसाठी बोलावल्याने हे सरकार कायदेशीर असल्याचं, सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले. आधीही आमचं सरकार हे कायदेशीर आणि संविधानिकच होतं, पण काही लोकांना शंका होती त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांची शंका दूर केल्याचं फडणवीस म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -