घरमहाराष्ट्रनाशिककॉलेजरोडवरील 'त्या' तरुणीचा गळा दाबून खून!

कॉलेजरोडवरील ‘त्या’ तरुणीचा गळा दाबून खून!

Subscribe

कॉलेजरोडवरील एका इमारतीच्या टेरेसवर मृतावस्थेत आढळून आलेल्या पंचवटीतील तरुणीचा खून झाल्याचे पोस्ट मॉर्टमच्या अहवालातून निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कॉलेजरोड येथील एका इमारतीच्या टेरेसवर एका तरुणीचा मृतदेह आढळला होता. हा मृतदेह कोणाचा आहे, याबाबत पोलीस तपास करत होते. पोलिस तपासणीत ही तरुणी कॉलेजरोडवरील एका दुकानात कामाला होती, असे माहित पडले आहे. या तरुणीचे नाव पायल परदेशी असे आहे. ही तरुणी पंचवटी येथे वास्तव्यास होती. दरम्यान, या तरुणीच्या मृतदेहाच्या पोस्ट मॉर्टम अहवालामध्ये तरुणीचा गळा दाबून खून झाल्याचे निष्पन्न झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – पत्नीच्या हत्येनंतर पतीने केला आत्महत्येचा प्रयत्न

- Advertisement -

काय आहे नेमकं प्रकरण?

पंचवटी कॉलेजमागील तपोन भागात राहणाऱ्या पायल परदेशी (२०) ही तरुणी कॉलेजरोडवरील एका कपड्याच्या दुकानास कामाला होती. मंगळवारी (दि.८) रात्री दुकान बंद झाल्यानंतर ती घरी परतली नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. बुधवारी दुपारच्या सुमारास तिचा मृतदेह एका इमारतीच्या गच्चीवर आढळून आला होता. टेरेसवर साफसफाईसाठी गेलेल्या एका व्यक्तीने पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत मृतदेह ताब्यात घेतला होता. पायलची आई सरला यांनी केलेल्या तक्रारीनुसार, मुलगी पायल हिचा जयेश रामचंद्र दामोधर (२३) याच्याशी विवाह झालेला होता. मात्र, जयेश हा पायलशी भांडण करून तिला उपाशी ठेवत. तिला मारहाण करत असे. त्यामुळे पायल सहा महिन्यांपासून माहेरी राहत होती. सोबत राहण्यात तयार नसल्याच्या रागातून जयेशने तिचा खून केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

हेही वाचा – करवा चौथच्या रात्रीच गर्भवती पत्नीचा खून

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -