घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनवरीच्या परतमुळासाठी गेलेली पिकअप उलटली; १० वर्षीय बालकासह आजी ठार, १५ जखमी

नवरीच्या परतमुळासाठी गेलेली पिकअप उलटली; १० वर्षीय बालकासह आजी ठार, १५ जखमी

Subscribe

नाशिक : सुरगाणा तालुक्यातील वाघधोंड येथील नुकतेच लग्न झालेल्या नवरीला आणण्यासाठी गेलेली पिकअप उलटली. या अपघात झाल्याने १० वर्षीय बालकासह 70 वर्षीय महिलेचा मृत्य झाला असून, 1५ जण जखमी झाले आहेत.
जखमींना नाशिक ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हेमराज रमेश थविल (रा. गारमाळ), कमळीबाई सयाजी देशमुख (रा. वाघधोंड) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. प्रल्हाद लक्ष्मण महाले (वय १6, रा.गणेशनगर, मिनाबाई गोविंद गावित (56 रा. वाघधोंड), सुमन यशवंत देशमुख (32 रा.वाघधोंड), जानकी रामदास जाधव (32 रा. वाघधोंड), रंगुबाई सीताराम देशमुख (65 रा. वाघधों), अनु रोहिदास देशमुख (60, रा.वाघधोंड), पार्वती पुंडलिक देशमुख (65, रा. वाघधोंड), लिलाबाई हरी देशमुख (45, रा.वाघधोंड), परिबाई भगवान देशमुख (50), वंदना रोहिदास देशमुख (26), चंद्राबाई काळू देशमुख (65), प्रमिला चंदर भोये (45), यमुना माधव जाधव (40), श्रीराम लहानु चौधरी (45), शेवंताबाई काशिनाथ गुंबाडे (50) अशी जखमींची नावे आहेत.

- Advertisement -
मुंबई-आग्रा महामार्गावर वाहनाच्या धडकेत पत्नी ठार, पती जखमी

मुंबई-नाशिक महामार्गावर माणिकखांब जवळ रविवारी (दि.१४) भरधाव वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत पत्नी ठार व पती जखमी झाल्याची घटना घडली. पत्नी वनिता सोपान राव (वय २३ रा. मुकणे, ता इगतपुरी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. पती सोपान किसन राव (वय २६) असे जखमीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोपान राव हे दुचाकीवरून पत्नीसमवेत रविवारी (दि.१४) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घोटीहून नाशिकच्या दिशेने जात होते. ते माणिकखांबजवळ आले असता त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात सोपान किसन राव गंभीर जखमी झाले तर वनिता राव जागेवरच ठार झाल्या. या घटनेची माहिती मिळताच जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या मोफत रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांना समजली. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी पुरुष व मयत महिलेस घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करत वनिता राव यांना मृत घोषित केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -