घरताज्या घडामोडीशिवभक्तांची इच्छा होणार पूर्ण; लंडनमधील शिवरायांची जगदंबा तलवार महाराष्ट्रात येणार?

शिवभक्तांची इच्छा होणार पूर्ण; लंडनमधील शिवरायांची जगदंबा तलवार महाराष्ट्रात येणार?

Subscribe

मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील प्रत्येक शिवभक्ताची छत्रपती शिवाजी महाराज यांची लंडनमध्ये असलेली जगदंबा तलवार महाराष्ट्र पाहायला मिळावी अशी इच्छा आहे. राज्यात असलेल्या शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर पाऊल ठेवताच प्रत्येकालाच या जगदंबा तलवारीते स्मरण होते. याच शिवभक्तांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. शिवरायांच्या लंडनमधील जगदंबा तलवारीचे महाराष्ट्रात दर्शन होणार आहे.

मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील प्रत्येक शिवभक्ताची छत्रपती शिवाजी महाराज यांची लंडनमध्ये असलेली जगदंबा तलवार महाराष्ट्र पाहायला मिळावी अशी इच्छा आहे. राज्यात असलेल्या शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर पाऊल ठेवताच प्रत्येकालाच या जगदंबा तलवारीते स्मरण होते. याच शिवभक्तांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. शिवरायांच्या लंडनमधील जगदंबा तलवारीचे महाराष्ट्रात दर्शन होणार आहे. कारण जगदंबा तलवार आणि वाघ नखे महाराष्ट्रात (Maharashtra) आणण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलली आहेत. (chhatrapati shivaji maharaj jagdamba sword and tiger claws will come to maharashtra in this year)

350 वा शिवराज्याभिषेक सोहळा (Shivrajyabhishek Ceremony) आणि आगामी सर्वच निवडणुका पाहता यावर्षीच तलवार आणि वाघ नखे देशात राज्य सरकार आणणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि काही अधिकारी जून महिन्यात लंडनला जाणार आहेत. शिवराज्याभिषेकाला 2024मध्ये 350 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यादृष्टीने राज्य सरकार एक आराखडा तयार करण्यात आला आहे. ब्रिटन सरकारजवळ या संदर्भात अंतिम टप्प्यात बोलणे सुरु आहे.

- Advertisement -

ब्रिटन सरकार आणि राज्य सरकारमध्ये नेमकी कोणती चर्चा सुरु?

  • महाराजांची जगदंबा तलवार आणि वाघ नखे काही काळासाठी भारतात पाठवण्यासंदर्भात चर्चा सुरु आहे
  • वर्षभर वाघ नखे आणि तलवार देशात असतील
  • राज्यातील सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि अधिकारी जून महिन्यात या संदर्भात चर्चा करण्यासाठी लंडनमध्ये जाणार आहेत
  • सांस्कृतिक आदान प्रदानासाठी महाराष्ट्रातील कलाकार ब्रिटनमध्ये सादरीकरण करतील आणि ब्रिटनचे कलाकार महाराष्ट्रात येऊन आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवतील.
  • महाराष्ट्राचे 25 विद्यार्थी ब्रिटनमध्ये अभ्यासासाठी जातील आणि ब्रिटनचे 25 विद्यार्थी महाराष्ट्रात येतील.
  • या सांस्कृतिक आदानप्रदानासंदर्भात महाराष्ट्र शासन आणि ब्रिटीश सरकारमधे लवकरच सामंजस्य करार होणार आहे.

राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त कार्यक्रम

- Advertisement -

राज्यात छात्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे होत आहे. त्यानिमित्ताने राज्यात शंभरपेक्षाही जास्त कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, शिवाजी महाराजांचे वंशज आणि अन्य नागरिकांना बोलवण्यात येणार आहे. शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षपूर्तीचा महोत्सव राज्य शासन राज्यभर मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे. त्या अनुषंगाने महाराजांची जगदंबा तलवार आणि वाघनखे ब्रिटनकडून आणण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आणि वाघ नखे देशात येणार याचा आनंद सर्वांनाच आहे. महाराजांची तलवार आणि वाघ नखे राज्यात आले तर ते देशात सर्वांना पाहता यावे यासाठी देशभर फिरवण्यात येईल अशीही शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महाराजांची तलवार आणि वाघ नखे देशात येणे हे आगामी काळात राजकारण ठरू शकते.


हेही वाचा – ‘मिठी नदीतील गाळ काढण्यात त्रुटी आढळल्या तर…’, मुख्यमंत्री शिंदेंचे पालिका आयुक्तांना खडेबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -