घरक्रीडाIPL 2023 : गुजरातच्या विजयामुळे मुंबईची पलटण प्ले ऑफमध्ये, चाहत्यांनी केलं सेलिब्रेशन

IPL 2023 : गुजरातच्या विजयामुळे मुंबईची पलटण प्ले ऑफमध्ये, चाहत्यांनी केलं सेलिब्रेशन

Subscribe

आयपीएल 2023 मधील कालचे सर्व डबल हेडर सामने रोमांचक ठरले आहेत. मुंबई इंडियन्सने हैदराबादचा पराभव केल्यानंतर गुजरातने आरसीबीचा दारूण पराभव केला. त्यामुळे मुंबई इंडियन्सला प्ले ऑफमध्ये जाण्याची संधी मिळाली. गुजरात टायटन्सचा युवा सलामी फलंदाज शुबमन गिलने शतकी खेळी करत आरसीबीचा धुरळा पाडला. त्यामुळे गुजरातने आरसीबीवर 6 गडी राखून विजय मिळवला आणि मुंबईचं प्ले ऑफमधील स्थान पक्कं झालं. परंतु प्ले ऑफमध्ये गेल्यानंतर मुंबईकरांनी फटाके फोडून जंगी स्वागत केलं.

आरसीबीचा वेगवान फलंदाज विराट कोहलीने शतकाच्या जोरावर गुजरातला विजयासाठी 198 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र, गुजरातने शुबमन गिलच्या नाबाद शतकाच्या जोरावर सामना जिंकला.

- Advertisement -

आरसीबीच्या या पराभवामुळे मुंबई इंडियन्सला लॉटरी लागली. गुजरातच्या विजयामुळे मुंबईची प्लेऑफमध्ये एन्ट्री झाली आहे. मुंबई प्लेऑफमध्ये पोहोचणारी चौथी टीम ठरली आहे. मुंबईच्या आधी गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या 3 संघांनी प्लेऑफसाठी प्रवेश मिळवला होता. त्यामुळे 21 मे रोजी मुंबई आणि आरसीबी या दोन्ही संघांमध्ये 1 जागेसाठी चुरस होती. या एका जागेसाठी मुंबई आणि आणि आरसीबीला कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकणं बंधनकारक होतं.

- Advertisement -

चाहत्यांनी केलं सेलिब्रेशन

दरम्यान, मुंबईनं सामनाही जिंकला आणि प्ले ऑफमध्ये आपलं स्थानही पक्कं केलं. परंतु प्ले ऑफमध्ये स्थान पक्क केल्यानंतर मुंबईच्या चाहत्यांकडून मुंबईतील रस्त्यावर आणि गल्लोगलीत फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. तसेच या जल्लोषाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

कोहलीची शतकी खेळी व्यर्थ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून विराट कोहलीने शानदार शतक झळकावलं. विराट कोहलीने 61 चेंडूत नाबाद 101 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 13 चौकार आणि 1 षटकार लगावला. त्याने आपल्या खेळीत 13 चौकार आणि 1 षटकार लगावला. पण कोहलीची शतकी खेळी व्यर्थ ठरली. गुजरात टायटन्सकडून सलामीवीर शुभमन गिलने शानदार शतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला. शुभमन गिलने 52 चेंडूत नाबाद 104 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 8 षटकार मारले.

शुभमन गिलशिवाय विजय शंकरने 35 चेंडूत 53 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने या खेळीत 7 चौकार आणि 2 षटकार ठोकले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक दोन गडी बाद केले. तर विजयकुमार वैशाक आणि हर्षल पटले यांना प्रत्येकी एक-एक गडी बाद करण्यात यश मिळाले.


हेही वाचा :IPL Playoffs : RCBच्या चाहत्यांच्या पदरी पुन्हा निराशा; मुंबईची प्लेऑफमध्ये एंट्री


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -