घरपालघरआरोग्य कर्मचारी निवासस्थानाचे लोकार्पण रखडले

आरोग्य कर्मचारी निवासस्थानाचे लोकार्पण रखडले

Subscribe

असून हे काम 12 महिन्यात पूर्ण करावयाचे होते.त्याप्रमाणे कामही पूर्ण झाले असून लोकार्पण सोहळयाअभावी हे काम रखडले आहे.

वाडा:  वाडा तालुक्यातील कुडूस येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान या योजने अंतर्गत आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थान बांधण्यात आले आहे. या निवासस्थानाचे लोकार्पण गेल्या वर्षभरापासून रखडल्याने कर्मचार्‍यांना भाड्याच्या खोलीत राहावे लागत आहे.तसेच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे रुग्णांना सेवाही देण्यात दिरंगाई होत असल्याने रुग्ण नाराजी व्यक्त करीत आहेत. हे निवासस्थान इमारत बांधकामाचे काम सन 2020 साली मंजूर झाले आहे.तळमजला अधिक तीन मजले अशी इमारत असून त्यासाठी 2 कोटी 33 लाख 12 हजार 777 इतका निधी मंजूर झाला आहे.निवासस्थान इमारत बांधकामाचे काम शिवसाई कंट्रक्शन या ठेकेदार कंपनीला शासनाने दिले असून हे काम 12 महिन्यात पूर्ण करावयाचे होते.त्याप्रमाणे कामही पूर्ण झाले असून लोकार्पण सोहळयाअभावी हे काम रखडले आहे.

मी आता त्या ठिकाणी राहावयास आलो असून उद्घाटन सोहळा नंतर करण्यात येईल.
डॉ. समाधान पगारे
वैद्यकीय अधिकारी
प्राथमिक आरोग्य अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -