घरताज्या घडामोडीतीन देशांच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी मायदेशात, विमानतळावर उतरताच साधला जनतेशी संवाद

तीन देशांच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी मायदेशात, विमानतळावर उतरताच साधला जनतेशी संवाद

Subscribe

तीन देशांच्या दौऱ्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक समर्थक उपस्थित होते. नरेंद्र मोदी यांनी भारतात परतताच विमानतळावर देशातील जनतेशी संवाद साधला. आज जगाला भारताविषयी जाणून घ्यायचं, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

जगाला लस दिली म्हणून विरोधकांनी माझ्यावर टीका केली. परंतु मला त्यांना हे सांगायचंय की, ही बुद्ध आणि महात्मा गांधींची भूमी आहे. आम्ही आमच्या शत्रूंचीही काळजी घेतो. आज जगाला जाणून घ्यायचं आहे की, भारत काय विचार करतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

- Advertisement -

तामिळ ही प्रत्येक भारतीयाची भाषा आहे. ती जगातील सर्वात जुनी भाषा आहे. मला पापुआ न्यू गिनीमध्ये थिरुक्कुरल या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन करण्याची संधी मिळाली. माझ्या देशाच्या महान संस्कृतीचा गौरव करताना मी नजर खाली ठेवत नाही. मी डोळ्यांत डोळे घालून बोलतो. हे सामर्थ्य आहे म्हणून आपण पूर्ण बहुमत असलेले सरकार बनवलं आहे. जेव्हा मी बोलतो तेव्हा जगाला वाटतं की १४० कोटी लोक बोलत आहेत, असं मोदी म्हणाले.

- Advertisement -

भारतावर प्रेम करणारे लोक आज येथे जमले आहेत, मोदींवर प्रेम करणारे नाही. तुम्ही सुद्धा हिंदुस्तानच्या संस्कृती, महान परंपरांविषयी बोलताना कधीच गुलामीची मानसिकता ठेवू नका. हिंमतीने बोला. जग ऐकण्यासाठी आतुर आहे, असंही मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी यांच्यानंतर जे. पी. नड्डा यांनी जनतेशी संवाद साधत मोदींचं कौतुक केलं. जग तुमच्या प्रशासनाच्या मॉडेलचे कौतुक करत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी तुमचा ऑटोग्राफ मागितला. यावरून तुमच्या नेतृत्त्वाखाली जग भारताकडे कसे पाहते हे दिसून येते. पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांनी तुमच्या पायाला स्पर्श केला. तुमचा आदर केला. आपल्या पंतप्रधानांचे अशाप्रकारे स्वागत होत असल्याचे पाहून भारतातील लोकांना तुमचा अभिमान वाटतो, असं जे. पी. नड्डा म्हणाले.


हेही वाचा : सपा नेते आझम खान निर्दोष मुक्त; अपात्रतेचे काय होणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -