घरताज्या घडामोडीनाना पटोले आणि संजय राऊत हे बोलघेवडे लोकं, देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका

नाना पटोले आणि संजय राऊत हे बोलघेवडे लोकं, देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका

Subscribe

अहमदनगरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनेक विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जलयुक्त शिवाराबाबत भाष्य करत त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली.

विकास कामांचा आढावा घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले की,  नाना पटोले आणि संजय राऊत हे बोलघेवडे लोकं आहेत. तुम्हाला काम पाहिजे म्हणून ते बोलतात. आम्हाला भरपूर कामं आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना उत्तरं देत नाहीत. कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल. तसेच शिवसेना आणि भाजपात कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. तसेच विखे-पाटील आणि राम शिंदे यांच्यात कोणताही वाद नाही, असं फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

३५७ गावं जलयुक्त शिवारच्या माध्यमातून आपण घेतली आहेत. त्याच्या कामाला आपण सुरूवात करणार आहोत. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेला गती देण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. पण यामध्ये जी काही पाणी धारण करण्याची क्षमता आहे. ती क्षमता वाढते आणि शेतकऱ्यांना देखील या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. शासन आपल्या दारी या योजनेतून विविध योजनांचा लाभ देण्यास सुरूवात करणार आहोत. शेतकऱ्यांना १२ तास वीज दिवसादेखील मिळणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

जलजीवन मिशनच्या सगळ्या कामांना केंद्र सरकारने पैसा दिला असला तरी, त्याचे टेंडर्स हे महाविकास आघाडीच्या काळात झाले. ते आमच्या कार्यकाळात झालेले टेंडर्स नाहीत. केंद्र सरकारने कधीही भेदभाव केला नाही. सगळा पैसा केंद्र सरकारचा होता. त्यावेळी महाविकास आघाडी काम करत होती. त्यामुळे काही तक्रारी आल्या असतील तर त्या तपासून बघू, असंही फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : ‘शिंदेंनी लोकसभेच्या 5 जागा लढवल्या तरी खूप झालं’; राऊतांची खोचक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -