घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रग्रामीण पोलिसांचे एकाचवेळी ४६ अवैध दारू अड्डयावर छापे; एसपी उमाप ऑनफील्ड

ग्रामीण पोलिसांचे एकाचवेळी ४६ अवैध दारू अड्डयावर छापे; एसपी उमाप ऑनफील्ड

Subscribe

नाशिक : ग्रामीण पोलिसांच्या सुमारे ५०० अधिकारी व अंमलदारांनी गुरुवारी (दि.२५) पहाटे चार वाजता विविध ठिकाणी गावठी दारूची अवैधपणे गाळप करणार्‍या ४६ ठिकाणी एकाच वेळी छापा टाकले. या छाप्यात सुमारे 10 लाख रुपयांची तयार दारू, रसायन व इतर साधन सामुग्री जप्त करण्यात आली असून, संबंधितांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याखाली ३४ गुन्हे दाखल केले आहेत.

कारवाईदरम्यान पोलिसांनी अवैध दारु गाळप करणार्‍या ठिकाणांसोबतच, रसायन बनवण्यासाठी लागणार्‍या गुळ विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी सटाणा तालुक्यातील ठेंगोडा व देवळा तालुक्यातील लोहणेर गावांतून मोठ्या प्रमाणावर काळा गूळ व नवसागर जप्त केला आहे. कारवाईत पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांच्यासह सहायक पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रदीप जाधव, पुष्कराज सूर्यवंशी, कविता फडतरे, ३१ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी, अंमलदार, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचेसह ९ विशेष पथकांनी सहभाग घेतला. अवैध व्यवसाय रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी नुकतीच १२ विशेष पथके गठीत केली आहेत. त्यांच्या मदतीने जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी चालणार्‍या अवैध व्यवसायांवर धडक कारवाया करण्यात आल्या आहेत.

अवैध व्यवसायासंबंधी नागरिकांनी ६२६२ २५६३६३ या हेल्पलाईनवर माहीती द्यावी. माहीती देणार्‍या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवले जाईल. : शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक

- Advertisement -

छापे टाकलेले ठिकाणे

 कळवण ११, वाडीवर्‍हे ५, मालेगाव तालुका हद्दीत ४, सुरगाणा, घोटी, देवळा, सटाणा, जायखेडा व इगतपुरीमध्ये प्रत्येकी ३, निफाड व पेठमध्ये प्रत्येकी २, सिन्नर, अभोणा, वणी व त्रंबकेश्वरमध्ये प्रत्येकी एक छापे टाकले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -