घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपार्टटाईम ऑनलाइन लाखो कमवण्याच्या नादात स्वताचे ३४ लाख गमावून बसला युवक

पार्टटाईम ऑनलाइन लाखो कमवण्याच्या नादात स्वताचे ३४ लाख गमावून बसला युवक

Subscribe

नाशिक : सोशल मीडियाशी संबंधित ऑनलाइन पार्टटाईम जॉबच्या माध्यमातून सायबर भामट्याला एका युवकाला तब्बल ३४ लाख रुपयांचा गंडविले. याप्रकरणी सायबर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनंजय केल्हे (रा. सातपूर) यांच्या फिर्यादीनुसार, केल्हे यांच्या मोबाईलवर त्यांना पार्टटाईम जॉब करा आणि लाखो रुपये मिळवा, अशी ऑफर संशयितांनी दिली. संशयितांनी त्यांना टेलिग्राम व व्हाट्सअ‍ॅपच्या माध्यमातून वारंवार संपर्क करून पैशांचे आमिष दाखविले. त्यासाठी त्यांना काम करण्याचा टास्क देण्यात आला. आधी काही रक्कम संशयितांनी सांगितलेल्या खात्यांत भरली. २८ मार्च ते १२ एप्रिल २०२३ या कालावधीत केल्हे यांनी एकूण ३३ लाख ८५ हजार रुपये भरले. फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी टेलिग्राम आयडीधारक आणि ७०२३९६७६२४ चे व्हॉटस्अ‍ॅप वापरकर्ता, रक्कम ज्या खात्यांवर जमा झाली. त्या बँक खातेधारकांवर गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास सायबर पोलीस करीत आहेत.

- Advertisement -
सावधान रहा 

ऑनलाइन आणि डिजिटल युगात जय पद्धतीने नवनवीन संधी निर्माण झाल्या आहेत. अशीच संधी ठगानाही उपलब्ध झाली आहे. डिजिटल जग ही पूर्णतः कृत्रिम जग आहे. समोरच्या व्यक्तिला जे दाखवायचे आहे तितकच आपण बघू शकतो. त्याने दाखवलेल्या आमिषाला आपण भाळून जाण्याची दाट शक्यता असते. मात्र, समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यात किती सत्यता आहे हे तपासणे आणि आपली पूर्णतः खात्री झाली तरच पुढे गेले पाहिजे.

आपले बँक खाते सांभाळा 

आजच्या डिजिटल पेमेंटच्या काळात आपला मोबाइल क्रमांक हेच आपले बँक खाते झाले आहे. सहसा कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपले अकाऊंट डिटेल्स देऊ नये असे आपल्याला वेळोवेळी अनेक माध्यमातून निर्देशित केले जाते. त्यामागे कारण असे आहे की ऑनलाइन ठग अनेक वेगवेगळ्या क्लूपत्या वापरुन आपल्याला ठगाण्याची शक्यता असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -