घरमहाराष्ट्रपुणेसद्-विवेक बुद्धीला स्मरून आम्ही काम करत असतो; बावनकुळेंच्या वक्तव्यावर अजित पवारांचा पलटवार

सद्-विवेक बुद्धीला स्मरून आम्ही काम करत असतो; बावनकुळेंच्या वक्तव्यावर अजित पवारांचा पलटवार

Subscribe

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसला अखेर ओबीसाची आठवण आली अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. तसेच ओबीसी समाजाचा खरा शत्रू राष्ट्रवादीच आहे, ओबीसी मेळावा म्हणजे राष्ट्रवादीची नौटंकी आहे आणि ओबीसी समाजातील लोक राष्ट्रवादीच्या प्रेमात पडणार नाही, अशी टीका महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.  बावनकुळेंच्या या वक्तव्यानंतर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले की, आमच्या सद्-विवेक बुद्धीला स्मरुण आम्ही काम करत असतो. (Remembering common sense, we act; Ajit Pawar hits back at Bawankule’s statement)

अजित पवार यांना बावनकुळेंच्या टीकेबद्दल विचारले असता ते म्हणाले की, आमच्याबद्दल टिकात्मत बोलणे हा सत्तांधारी लोकांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. त्या पद्धतीने ते बोलतात. आम्ही त्यांना जास्त महत्त्व देत नाही. त्यांना जे बोलायचे ते त्यांनी बोलावे. आम्हाला माहित आहे. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना ओबीसींना ज्या वेळेस प्रतिनिधित्व मिळत नव्हत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये फक्त शेड्यूल टाईप, शेड्यूल कास्ट आणि ओपन श्रेणीला प्रतिनिधित्व मिळत होते. त्यावेळेस जाणीवपूर्वक निर्णय घेतला की, आपण न्यायालयात जाऊ. त्यावेळेस आम्हाला कळलं मध्यप्रदेशमध्ये सत्ताधारी न्यायालयात गेले आणि निकाल त्यांच्या बाजूने लागला. मग आपण आपली काही लोकं मध्यप्रदेशमध्ये पाठवली. तिथल्या सरकारशी चर्चा केली की, तुम्ही काय केले. तशा पद्धतीने बांठीया आयोग नेमला. बांठीया आयोग म्हणजे पूर्वी चीप सेक्रेटरी होती. त्यांनी त्याबद्दल जो अहवाल दिला त्या अहवालाला अनुसरून नंतर कॅबिनेटने निर्णय घेतला आणि आम्ही आमची भूमिका सुप्रीम कोर्टापर्यंत नेली. त्याच्यातून जो निर्णय लागला तो सगळ्याच्या समोर सर्वश्रूत आहे.

- Advertisement -

आज त्याचं सरकार येऊन आज जवळपास वर्ष होत आलं. मग एक वर्षात त्यांनी निवडणुका घेतल्या का? असा प्रश्न  उपस्थित करत अजित पवार म्हणाले की, मग कशाला दुसऱ्याला नाव ठेवतात. दुसऱ्यावर बोट ठेवतात. तुम्ही एक बोट राष्ट्रवादीकडे दाखवत असताना तीन बोट तुमच्याकडे याचं कुठेतरी तारतम्य बोलणाऱ्याला आहे का नाही, असे म्हणत त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना टोला लगावला.

आमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरुण आम्ही काम करत असतो
अजित पवार म्हणाले की, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मंडल आयोगाकडून पहिल्यांदा व्हि. पी. सिंग यांनी निर्णय घेतला  होती. त्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांनी अंमलबजावणी केली होती. मंडल आयोगाची अंमलबजावणी झाल्यानंतर महिलांना पहिल्यांदा 30 टक्के जागा, 33 टक्के जागा आणि नंतर 50 टक्के जागा हाही निर्णय कोणी घेतला हे उभ्या महाराष्ट्राला, भारताला माहित आहे. त्यामुळे आम्हाला जास्त खोलात जायचं कारण नाही. आमच्या सद्-विवेक बुद्धीला स्मरुण आम्ही काम करत असतो, बोलत असतो. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्हाला कोणत्या निवडणुका समोर ठेवून यासंदर्भामधल्या काही गोष्टी करायच्या अजिबात गरज नाही, असेही अजित पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -