घरमहाराष्ट्रbihar bridge collapse : बिहारमधील पूल दुर्घटनेशी संबंधित 'त्या' कंत्राटदाराचे कंत्राट रद्द...

bihar bridge collapse : बिहारमधील पूल दुर्घटनेशी संबंधित ‘त्या’ कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करा; कॉंग्रेसची मागणी

Subscribe

 

मुंबई: bihar bridge collapse बिहार राज्यातील गंगा नदीवर उभारण्यात येत असलेल्या पुलाचे चार स्तंभ कोसळण्याची घटना नुकतीच घडली. या पुलाचे काम करणारा व मुंबईतील गोरेगाव – मुलुंड लिंक रोड अंतर्गत उन्नत मार्ग उभारणी, रत्नागिरी हॉटेल चौक व डॉ. हेडगेवार चौक येथे सहा पदरी पुलाची उभारणी आदी ६६६ कोटी रुपयांची कामे हाती घेतलेला कंत्राटदार मे.एस.पी. सिंगला कन्स्ट्रक्शन हा एकच कंत्राटदार आहे. त्यामुळे बिहारमधील घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मुंबईतील कामांची झाडाझडती घ्यावी व चौकशी करावी. त्या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करावे व दुसरा चांगला कंत्राटदार नेमण्यात यावा, अशी मागणी कॉंग्रेसतर्फे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे रवी राजा यांनी एक पत्र पाठवून वरीलप्रमाणे मागणी केली आहे.
बिहार येथील भागलपूर जिल्ह्यातील गंगा नदीवर पुल उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र गेल्याच आठवड्यात सदर पुलाचे उभारलेले चार स्तंभ कोसळून मोठी दुर्घटना घडली सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही. मात्र सदर दुर्घटनेमुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

हेही वाचाःकाँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांची ‘माय महानगर’च्या स्वप्निल जाधव यांना धमकी

- Advertisement -

बिहारमधील गंगा नदीवर १,७१० कोटी रूपये खर्चाचा पूल उभारण्याचे काम मे.मे.एस.पी. सिंगला कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराकडून करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे ह्याच कंत्राटदाराकडून मुंबई महापालिका पूर्व व पश्चिम उपनगराला जोडणाऱ्या गोरेगाव – मुलुंड लिंक रोडच्या कामाअंतर्गत मुलुंड खिंडीपाडा येथे उन्नत मार्ग उभारणी, रत्नागिरी हॉटेल चौक व डॉ. हेडगेवार चौक येथे सहा पदरी पुलाची उभारणी आदी ६६६ कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. काही प्रमाणात कामे झाली असून काही कामे सुरू आहेत.

यासंदर्भातील प्रस्ताव महापालिका स्थायी समितीच्या २० डिसेंबर २०२१ रोजी पार पडलेल्या बैठकीत प्रस्ताव मंजूर करण्यात आला होत. बिहारमधील गंगा नदीवरील पुलाचे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे झाल्यानेच सदर पुलाचे चार स्तंभ कोसळून दुर्घटना घडली. त्यामुळे बिहारमधील घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सदर कंत्राटदाराने मुलुंड – गोरेगाव लिंक रोड अंतर्गत केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांची पालिकेने सखोल पाहणी करून चौकशी करावी. तसेच, या कामांत हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदाराचे कंत्राट तातडीने रद्द करून नवीन कंत्राटदार नेमावा व त्याच्याकडून सदर कामे करून घ्यावीत. सदर कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

लोअर परळ पुलाची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली

लोअर परळ, वरळी, प्रभादेवी आणि करीरोड, भायखळा परिसरात वाहतुकीसाठी सोयीस्कर असलेल्या लोअर परळ (डिलाईल रोड) पुलाची पश्चिमेकडील मार्गिका १ जूनपासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना, वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या लोअर परळ पुलाचे ८७ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित टप्प्यातील पूर्व दिशेचा पूल जुलै २०२३ अखेरीस वाहतुकीसाठी संपूर्ण क्षमतेने खुला करण्यात येणार आहे.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -