घरमनोरंजनबिपाशा बसूने ठेवलं मुलीचं 'हे' गोड निकनेम

बिपाशा बसूने ठेवलं मुलीचं ‘हे’ गोड निकनेम

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसु आणि करण सिंह ग्रोवर काही महिन्यांपूर्वी आई-बाबा झाले. सध्या हे दोघेही आपल्या पालकत्वाचा आनंद घेत आहेत. बिपाशाने 12 नोव्हेंबर 2022 रोजी मुलगी देवीला जन्म दिला. त्यानंतर अनेकदा बिपाशाने आपल्या मुलीचे फोटो देखील शेअर केले होते. दरम्यान, नुकतीच बिपाशाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये बिपाशा तिच्या मुलीसोबतचा क्यूट फोटो शेअर केला आहे. शिवाय आपल्या मुलीचं निकनेम सांगितले आहे.

बिपाशाने सांगितलं मुलीचं निकनेम

बिपाशाने पोस्ट शेअर करत खाली तिच्या मुलीच्या निकनेमचा खुलासा केला आहे. यात तिने खाली कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “देवीचे निकनेम मिष्टी आहे. तिला हे नाव तिच्या मुमू आईने दिलं आहे. हे नाव तिला पूर्णपणे सूट होत आहे. बोंग गर्लला तिचं निकनेम मिळालं आहे.”बिपाशा बसुच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिलंय की, ओ मिष्टी देवी, किती सुंदर नाव आहे. जर दुसऱ्याने लिहिलंय की, हे माझ्या आवडीच्या नावांपैकी एक आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

- Advertisement -

दरम्यान, अलीकडेच वडील करण सिंह ग्रोवर आणि बिपाशा यांनी मुलगी देवीसाठी Audi Qute 7 कार खरेदी केली होती, ज्याची किंमत सुमारे 1 कोटी रुपये आहे. कारचा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करताना बिपाशाने, “देवीची नवीन सवारी, दुर्गा दुर्गा” असं लिहिलं होतं.

2016 साली झालं बिपाशा-करणचं लग्न

बिपाशाने 2001 मध्ये तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘अजनबी’ या सिनेमातून केली होती. या चित्रपटात तिने अक्षय कुमारसोबत काम केले होते. याशिवाय बिपाशा बसूने ‘राज’, ‘रक्त’, ‘फूटपाथ’, ‘ऐतबार’सह अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. बिपाशा बसू बऱ्याच दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. तिने शेवटचे 2015 मध्ये ‘अलोन’ चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत करण सिंग ग्रोव्हर दिसला होता. तिथून दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली आणि त्यानंतर 2016 मध्ये दोघांनी लग्न केले. बिपाशासोबतचे हे त्याचे तिसरे लग्न आहे.

- Advertisement -

हेही वाचा :

‘आदिपुरुष’च्या प्रदर्शनापूर्वी प्रभासने घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -